नंदुरबारात फक्त दोनच ठिकाणी वीज अटकाव केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:37 PM2018-06-04T12:37:28+5:302018-06-04T12:37:28+5:30

वीज अटकाव मनोरे : दुर्गम भागात अधिक घटना, वीज पडून मृतांची संख्या दरवर्षी वाढतेय

Electricity halt centers in only two places in Nandurbar | नंदुरबारात फक्त दोनच ठिकाणी वीज अटकाव केंद्र

नंदुरबारात फक्त दोनच ठिकाणी वीज अटकाव केंद्र

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आकाशातील नैसर्गिक वीज अटकविण्यासाठी असलेली यंत्रणा जिल्ह्यात पुरेशी नाही. यापूर्वी करण्यात आलेल्या सव्र्हेत सात ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. पैकी दोनच ठिकाणी वीज अटकाव मनोरे बसविले. पूर्वीची दोन आहेत. अधिकृतरित्या केवळ चारच ठिकाणी असे मनोरे उभारण्यात आलेले आहेत. त्यांची संख्या आणखी वाढविणे अपेक्षित आहे. विशेषत: दुर्गम भागात ते गरजेचे असल्याचे चित्र गेल्या काही वर्षातील घटनांवरून स्पष्ट होते.
नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये पावसाळ्यात वीज पडून जीवित व वित्तहानी होण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणावर घडतात. त्यामुळे आकाशातील विजेला अटकाव करण्यासाठी तांत्रिकदृष्टय़ा उंच मनोरे उभारले जातात. शासनाच्या वतीने त्यांची उभारणी होते. परंतु नंदुरबार जिल्ह्याच्या विचार करता शासन, प्रशासनातर्फे अवघ्या चार ठिकाणीच ते उभे करण्यात आले आहेत. त्यांची संख्या आणखी वाढविण्याची सद्य:स्थितीतील गरज आहे. गेल्या दोन ते तीन वर्षातील घटना लक्षात घेता वीज पडून मृत्यू होणा:यांची संख्या अधिक आहे.
येथे आहेत अटकाव मनोरे..
जिल्ह्यात अवघ्या चार ठिकाणी वीज अटकाव मनोरे उभारण्यात आलेले आहेत. त्यात नंदुरबार शहर, बालआमराई, ता.नवापूर, कळंबू, ता.शहादा व तळोदा शहर या ठिकाणांचा समावेश आहे. 
शासनाने सर्वेक्षण करून सात ठिकाणांची निवड केली होती. त्यापैकी केवळ दोन ठिकाणी मनोरे बसविण्यात आले आहेत. त्यापूर्वी दोन ठिकाणी होतेच. उर्वरित पाच ठिकाणीदेखील तातडीने मनो:यांची उभारणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
अनेकांचा मृत्यू
जिल्ह्यात गेल्या काही वर्षातील वीज पडून मृत पावलेल्यांची आकडेवारी पाहिली तर दरवर्षी त्यात वाढच होत असल्याचे दिसून येत आहे.  2014 मध्ये सात जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता. 2015 मध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. 2016 मध्ये सहा तर गेल्या वर्षी देखील पाच जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय पाळीव प्राण्यांची संख्या आणखी वेगळी आहे. 
एक लाख सानुग्रह अनुदान
वीज पडून होणा:या मृत्यूस  नैसर्गिक मृत्यू म्हटले जाते. त्यासाठी तलाठीचा पंचनामा, पोलिसात करण्यात आलेली नोंद या आधारावर मृतकाच्या वारसास एक लाख रुपये मदत दिली जाते. याशिवाय पाळीव पशूंचा मृत्यू झाल्यास त्यालाही नुकसान भरपाई दिली जाते.
विविध कारणे
वीज पडण्याचे प्रमाण का वाढले याबाबत विविध मतप्रवाह आहेत. पूर्वी पावसाळ्याच्या सुरुवातीला होणारे वादळवा:याच्या वेळी वीज पडण्याचे प्रमाण अधिक राहत असे. आता तर संपूर्ण पावसाळा तसेच बेमोसमी पावसाच्या वेळीदेखील वीज पडत आहे. पर्यावरणवादी तसेच इतर अभ्यासकांचे याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. 
जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, वृक्षांची कमी झालेली संख्या ही कारणे दिली जात आहेत. एकुणच वीज पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.जिल्ह्यात ज्या चार ठिकाणी नैसर्गिक वीज अटकाव मनोरे आहेत त्या मनो:यांची वीज अटकाव करण्याची रेंज ही केवळ पाच ते सात किलोमीटर परिघाच्या आतच आहे. याशिवाय कारखाने, पवन ऊर्जा कंपनीचे टॉवर, मोठय़ा शासकीय व खासगी इमारती यांच्यासह मोबाइल टॉवरवरदेखील वीज अटकाव करण्यासाठी तशी यंत्रणा उभारली जाते. तसा शासनाचा नियमच आहे. ठरावीक उंचीची इमारत, टॉवर उभारल्यास वीज अटकाव यंत्रणा तेथे बसवावीच लागते. परंतु त्यांची क्षमता ही तेवढय़ा एरियापुरतीच मर्यादित राहते. त्यामुळे त्यांचा फारसा उपयोग इतर ठिकाणच्या नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी होऊ शकत नाही. त्यामुळे शासनातर्फे उभारण्यात येणा:या मनो:यांचाच सर्वाधिक उपयोग होत असतो.
जिल्ह्यात सर्वाधिक वीज पडण्याचे प्रमाण पाहता सर्वेक्षण करून सात ठिकाणी मनोरे बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यात नंदुरबार तालुक्यातील पूव्रेकडील भाग, अक्कलकुवा, तळोदा, धडगाव, नवापूर शहर व शहादा शहर या ठिकाणांचा समावेश होता.
 

Web Title: Electricity halt centers in only two places in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.