शहाद्यात गॅस गोडावूनजवळ विद्युत रोहित्राला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:08 PM2018-03-26T12:08:39+5:302018-03-26T12:08:39+5:30

Electricity Rohilla fire by shaking gas in Shahada | शहाद्यात गॅस गोडावूनजवळ विद्युत रोहित्राला आग

शहाद्यात गॅस गोडावूनजवळ विद्युत रोहित्राला आग

googlenewsNext

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 26 : शहरातील गरीब नवाज कॉलनी गॅस गोडावूनजवळील विद्युत रोहित्राला अचानक आग लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली होती.
गरीबनवाज कॉलनीतील गॅस गोडावूनच्या अगदी जवळील रोहित्राने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. या रोहित्राला लागूनच काही व्यवसायिकांची दुकाने आहेत. आग लागल्याचे समजताच व्यासायिकांमध्ये धावपळ उडाली. रोहित्राच्या बाहेरील ऑईल जास्त उष्णतेमुळे जळाल्याचे सांगण्यात आले. पेट घेतल्यानंतर रोहित्रामधून मोठा धूर निघत होता. काही नागरिकांनी नगरपालिकेला कळविल्यानंतर फायर फायटर लागलीच घटना स्थळी आले. मात्र विद्युत पुरवठा बंद केल्याने ही आग आटोक्यात आली.
या परिसरातील मोठे गॅस गोडाऊन असून लहान-मोठय़ा व्यावसायिकांची दुकाने आहेत. आग अधिक भडकली असती तर मोठी दुर्घटना झाली असती म्हणून उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
 

Web Title: Electricity Rohilla fire by shaking gas in Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.