वीज चोरीमुळे इतरांचेही होताय हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:58 AM2017-10-30T11:58:08+5:302017-10-30T11:58:08+5:30

शेतक:यांची वीजजोडणी खंडीत : पिकांना पाणी देणेही झाले कठीण

 Electricity was due to others due to theft | वीज चोरीमुळे इतरांचेही होताय हाल

वीज चोरीमुळे इतरांचेही होताय हाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शेतक:यांच्या  कृषी पंपाचे थकित  वीज बिलासाठी आता थेट विद्युत रोहित्रावरील विजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केली आह़े  मात्र, या कारवाईमुळे नियमीत बील भरणा:या शेतकरींना झळ बसत आह़े पाण्याअभावी पीके करपत आहेत़ या प्रकरणी महावितरणच्या वरीष्ठ अधिका:यांनी दखल घेण्याची शेतक:यांची मागणी आह़े
तळोदा तालुक्यात साधारण पावणे सहा हजार कृषी पंप धारक शेतक:यांची संख्या आहे. या सर्व कृषी पंपधारक शेतक:यांना येथील वीज वितरण कंपनीकडून  वीजपुरवठा दिला आह़े तथापि यातील जवळ जवळ 5 हजार 500 शेतक:यांकडे या विभागाचे 46 कोटी रुपयांचे विज बिल गेल्या अनेक वर्षांपासून थकले आह़े या थकित बिलांसाठी महावितरणतर्फे अनेक वेळा सूचना दिल्या आहेत़ परंतू शेतकरी बील भरण्याबाबत सकारात्मकता दाखवत नाही़ परिणामी महावितरण कंपनीने त्यांच्या कृषी पंपाच्या जोडण्या कट केल्या आहेत़ 
तरीही थकबाकीदार शेतकरी पुन्हा केबल टाकून वीज चोरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे आता थेट कृषी पंपाला विजपुरवठा करणारे विद्युत रोहित्रच बंद करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आह़े आता पावेतो जवळपास 70 विद्युत रोहित्र बंद करण्यात आल्याची माहिती संबंधित विज वितरण कंपनीच्या प्रमुख अधिकारीने दिली आहे. थकबाकीदार शेतक:यांचा वीजपुरवठा कंपनीने खंडित केला असला, तरी त्याची झळ नियमीत वीज बिल भरणा:या शेतक:यांनादेखील बसत आह़े कारण खंडित पुरवठामुळे पिकांना पाणीही देता येत नसल्याने पिक जगविण्यासाठी शेतक:यांना मेहनत घ्यावी लागत आह़े 
दरम्यान, शेतक:यांचा रब्बी हंगाम सुरु झाला आहे. या हंगामतील गहु, हरभरा, रबी ज्वारीची पेरणी करण्यासठी लगबग सुरु झाली आहे त्यासाठी सुरुवातीला कोरडे झालेले क्षेत्र भिजवावे लागते मात्र पाणी अभावी क्षेत्र तसेच पडले आह़े वीज मंडळाच्या आडमुठेपणामुळे या पेरण्या लांबण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या शिवाय पाणी अभावी केळी, पपई, ऊस ही पीकेही करपत  आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्ण हतलब झाला आहे. 
आधीच सततच्या भारनियमनामुळे जसे-तसे पिक वाचविलेत तसेच परतीच्या पावसाने केलेले मोठे नुकसान याने शेतक:यांची पूर्ण कंबर मोडली गेली आह़े जेमतेम रब्बी हंगामावर आता शेतक:यांचे लक्ष केन्द्रीत झाले असतांना वीज वितरण कंपनीने थकित बिलांसाठी तगादा लावला आह़े साहजिकच शेतकरी मेटाकुटीला आला असल्याची व्यथा आह़े 
निदान वीज खात्याच्या मंत्र्यांनी शेतक:यांची विदारक अवस्था लक्षात घेवून वीज वितरण कंपनीने हाती घेतलेली कृषी पंपाचे कनेक्शन कापण्याच्या मोहीमेला मार्च-एप्रिल र्पयत स्थगिती द्यावी अशी शेतक:यांची मागणी आह़़े  अन्यथा या विरोधात शेतक:यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आह़े

Web Title:  Electricity was due to others due to theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.