नियमबाह्य बदल्यांमुळे कर्मचारी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:52 PM2019-06-26T12:52:11+5:302019-06-26T12:52:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : महसूल विभागातर्फे तहसील कार्यालयातील कर्मचा:यांच्या इतर विभागात बदल्या करण्यात आल्या असून, या बदली सत्रातील ...

Embarrassed employees due to unchangeable transfers | नियमबाह्य बदल्यांमुळे कर्मचारी नाराज

नियमबाह्य बदल्यांमुळे कर्मचारी नाराज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : महसूल विभागातर्फे तहसील कार्यालयातील कर्मचा:यांच्या इतर विभागात बदल्या करण्यात आल्या असून, या बदली सत्रातील अनेक कर्मचा:यांच्या बदल्या नियमबाह्य झाल्यामुळे कर्मचा:यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
तळोदा येथील तहसील कार्यालयातील लिपिक डी.बी. हेडगे यांची नंदुरबार तहसील कार्यालयात, चंदू गावीत नवापूर तहसील, सुहास पाठक व बी.बी. मराठे धडगाव तर अव्वल कारकून ज्योती ठाकरे यांची नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात नगरपालिका शाखेत करण्यात आली आहे. या झालेल्या बदल्या नियमबाह्य असल्याचे कर्मचा:यांचे म्हणणे          आहे. ज्या कर्मचा:यांचे 31 मे पासून सेवानिवृत्तीस एक वर्ष बाकी आहे अशा कर्मचा:यांची सेवानिवृत्तीस एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असतांना सर्व साधारण बदलीस पात्र असल्याने व त्याचे त्याच्या पसंतीच्या ठिकाणी बदली मागितली असल्यास त्यास प्राधान्य देण्यात यावे, असा शासकीय बदल्यांबाबत शासन निर्णय क्रमांक एस.आर.व्ही.2017 प्र.क्र.415 कार्यालय 12 असतांना ही शासकीय निर्णयां हरताळ फासण्यात           आल्याचे कर्मचा:यांमध्ये बोलले जात आहे. बदली झालेल्या कर्मचा:यांमध्ये बी.बी. मराठे या लिपिकाच्या सेवानिवृत्तीस केवळ एक-दीड वर्ष बाकी असतांनाही त्यांची येथील तहसील कार्यालयातून धडगाव तहसील कार्यालयात बदली करण्यात आली आहे. नियमबाह्य व शासकीय आदेश डावलून करण्यात आलेल्या बदलीसत्रामुळे कर्मचा:यांमधून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. 

Web Title: Embarrassed employees due to unchangeable transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.