कर्मचा:याच्या प्रामाणिकपणामुळे हरवलेली सोनसाखळी अवघ्या तासाभरात परत मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:21 PM2019-10-07T12:21:52+5:302019-10-07T12:22:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पहाटेच्यावेळी पालिका उद्यानात फिरण्यासाठी गेलेल्या महिलेची हरवलेली सोनसाखळी पालिका कर्मचा:याने शोधून देत ती प्रामाणिकपणे ...

Employee: Due to its honesty, the lost gold chain was returned within an hour | कर्मचा:याच्या प्रामाणिकपणामुळे हरवलेली सोनसाखळी अवघ्या तासाभरात परत मिळाली

कर्मचा:याच्या प्रामाणिकपणामुळे हरवलेली सोनसाखळी अवघ्या तासाभरात परत मिळाली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पहाटेच्यावेळी पालिका उद्यानात फिरण्यासाठी गेलेल्या महिलेची हरवलेली सोनसाखळी पालिका कर्मचा:याने शोधून देत ती प्रामाणिकपणे महिलेला परत केली़ कर्मचा:याच्या या प्रामाणिकपणाचे शहादा शहरातून कौतूक करण्यात येत आह़े
 गांधी नगर भागात नगरपालिकेचे गांधी उद्यान आह़े नागरिकांसाठी चांगली सोय असल्याने याठिकाणी पहाटेपासून ज्येष्ठांसह महिला पुरुष फिरण्यासाठी येतात़ रविवारी सकाळी 6 वाजता तूप बाजारातील क्रांती चौकात राहणा:या ताराबाई पंढरीनाथ कडू ह्या फिरण्यासाठी आल्या होत्या़ दरम्यान फिरताना त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची 1 लाख रुपये किमतीची सोनसाखळी अचानक नाहिशी झाली होती़ ताराबाई ह्या घरी गेल्यानंतर हा प्रकार त्यांना समजून आला़ लाख रुपयांची वस्तू हरवल्याने त्या हताश झाल्या होत्या़ त्यांच्या कुटूंबियांनी ही माहिती उद्यानाचे केअरटेकर भरत मोहन पाटील यांना कळवली होती़ पाटील यांनी नियमाप्रमाणे सकाळी साडेसात वाजता उद्यान बंद केले होत़े  माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने उद्यान उघडून शोधाशोध केली असता गवतावर सोनसाखळी दिसून आली़ ही चेन ताराबाई यांना परत करण्यात आली़ भरत पाटील यांच्या कर्तव्यतत्परतेमुळे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळत होत़े केअरटेकर भरत पाटील यांच्या तत्परतेचे शहरात कौतूक करण्यात येत आह़े 
 

Web Title: Employee: Due to its honesty, the lost gold chain was returned within an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.