कर्मचा:यांच्या अनुपस्थितीमुळे जि़ प़ अध्यक्षांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 02:55 PM2018-08-25T14:55:55+5:302018-08-25T14:56:03+5:30

उमराण प्रा़ आ़ केंद्र : विद्यार्थिनीला चक्कर येऊनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही

Employee: Respect for the absence of President of the President | कर्मचा:यांच्या अनुपस्थितीमुळे जि़ प़ अध्यक्षांचा संताप

कर्मचा:यांच्या अनुपस्थितीमुळे जि़ प़ अध्यक्षांचा संताप

Next

नवापूर : तालुक्यातील उमराण प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी भेट दिली असता वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी  अनुपस्थित असल्याचे आढळून आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. 
उमराण येथील ग्रामविकास संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व माध्यमिक विद्यालयात  मानविकास योजनेअंतर्गत  रजनी नाईक यांचा हस्ते तसेच उमराणच्या सरपंच शैलाबाई वसावे, उपसरपंच गोरजी गावीत व उमराण येथील ग्रामविकास संस्थेचे सचिव दिपक वसावे यांच्या उपस्थितीत मुलींना सायकल वाटप करण्यात आले. 
कार्यक्रमात अचानक मोनिका गावीत रा. चेडापाडा या विद्यार्थिनीला फिट आले. तिला उमराण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी रुग्णवाहीकेस बोलविण्यात आले. मात्र 108 रुग्णवाहीकेचा चालक उपस्थित नसल्याने स्वत:च जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी शिक्षकांच्या मदतीने आपल्या वाहनातून मोनिकाला  उमराण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ परिचारिका उपस्थित होत्या. वैद्यकीय अधिकारी व रुग्णवाहिका चालक अनुपस्थित असल्याचे आढळून आले.  पारिचारिकांनी विद्यार्थिनीला सलाईन लावत औषधोपचार केले. त्या रुग्ण विद्यार्थिनीची तपासणीसाठी एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रजनी नाईक यांनी संताप व्यक्त       केला. 
अनेक वेळा प्राथमिक आरोग्य केंद्रात अशी स्थिती निर्माण होत असल्याने यातून रुग्णांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याच्या संतप्त  भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े रजनी नाईक यांनी उपस्थित कर्मचा:यांची चांगलीच कानउघाडणी करुन पुन्हा असे प्रकार घडता कामा नयेत अशी तंबीही           दिली़
24 विद्यार्थिनींना सायकल वाटप
 न्यु इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय उमराण येथील 15 मुलींना व अंजने येथील 9 मुलींना सायकल वाटप करण्यात आले. या वेळी रजनी नाईक म्हणाल्या की,  मानव विकास योजनेअंतर्गत या मुलींना पाच कि. मी. अंतरावरून ये-जा करणे सुलभ होणार आहे. विद्याथीर्नींनी चांगले शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहावे. वयात आल्यावर लग्न करा. 
कमी वयात लग्न केल्यामुळे कुपोषणाचा धोका असतो. सर्वानी किमान एक वृक्ष आपल्या घरासमोर लावुन त्याचे संवर्धन केले पाहीजे. व्यसनापासून दुर रहा व आपला परीसर नेहमी स्वच्छ ठेवा. 
शौचालयाचा वापर नेहमी करा व पावसाळ्यात पाणी उकळून आदी मार्गदर्शन करण्यात आल़े नंदुरबार जिल्हा परिषदेने जिल्हा तंबाखुमुक्त करण्याचा संकल्प केला आह़े त्यासाठी सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. एम. पाटील यांनी केले तर आभार शरद पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले

Web Title: Employee: Respect for the absence of President of the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.