कर्मचा-यांना लसीकरणाचे भान, मिळाले नंदुरबारला तिसरे स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 12:00 PM2021-01-30T12:00:17+5:302021-01-30T12:00:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाचा वेगही समाधानकारक असल्याचे ...

Employees became aware of vaccination, Nandurbar got third place | कर्मचा-यांना लसीकरणाचे भान, मिळाले नंदुरबारला तिसरे स्थान

कर्मचा-यांना लसीकरणाचे भान, मिळाले नंदुरबारला तिसरे स्थान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाचा वेगही समाधानकारक असल्याचे समोर आले आहे. नाशिक विभागातून जिल्हा तिस-या क्रमांकावर असून प्रथम क्रमांक धुळे जिल्ह्याने पटकावले आहे. नंदुरबार जिल्ह्यात सात सेंटर्सवर दैनंदिन लसीकरणाची टक्केवारी ही ७७ टक्के असल्याचे विभागाकडून कळवण्यात आले आहे. तर शेजारील धुळे जिल्हा १११ टक्के कामगिरीसह पुढे आहे. 
             सुमारे ११ हजार ६०७ शासकीय आणि खाजगी वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा यांना कोरोव्हॅक्सीन ही लस दिली जाणार असल्याने त्यांची माहिती ॲपवर भरुन देण्यात आली होती. यातील वयाने कमी आणि शारिरिक क्षमता अधिक सक्षम असलेल्या कर्मचा-यांना जिल्ह्यात प्रथम मान देत लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला होता. या लसीकरणाला जिल्ह्यात चार ठिकाणी सुरुवात करण्यात आली होती. परंतू दैनंदिन ४०० लाभार्थींना लस देण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले होते. परंतू अनेकांनी लसीकरणाला दांडी मारल्याने १०० लस देण्याचे उद्दीष्ट्य अपूर्ण राहत असल्याचे दिसून आले होते. यातून आणखी तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आल्यानंतर दिवसभरात ७०० जणांना लस देण्याचे उद्दीष्ट्य समोर आले होते.  २८ जानेवारी रोजी नंदुरबार जिल्ह्यात ७०० पैकी केवळ ४८० जणांचे लसीकरण झाले आहे. 

अंगणवाडी सेविका आणि मतदनीसांची होतेय जनजागृती 
लस घेतल्यानंतर किरकोळ ताप आणि इतर लक्षणे समोर आली आहेत. यातून काही आरोग्य कर्मचारी लस घेण्यासाठी येत नसल्याने दैनंदिन कोटा पूर्ण होण्यास अडचणी येत आहेत. परिणामी आरोग्य विभागाकडून आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना लसीकरणासाठी पाचारण करण्याची तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ४४० अगणवाडी सेविक आणि मदतनीस आहेत. त्यांच्या लसीकरणाने जिल्ह्यातील लस घेणा-या महिलांची टक्केवारी वाढणार आहे. आरोग्य विभागातील विविध संवर्गात काम करणा-या महिलांनाही लसीकरण करण्याच्या सूचना आहेत. 

कोरोना लसींचा दुसरा डोस आरोग्य विभागाला प्राप्त 

  • पहिल्या टप्प्यातील लसीकरण झाल्यानंतर दुस-या टप्प्यातील लसीकरण सुरु होणार आहे. यासाठी दुस-या टप्प्यातील एकूण १० हजार ५०० डोस जिल्ह्याला मिळाले आहेत. यानुसार कामकाज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 
  • जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १२ हजार ५०० डोस देण्यात आले होते. एकूण ११ हजार ६०७ लाभार्थींना हे डोस द्यायचे आहेत. आजअखेरीस जिल्ह्यातून ३ हजार ३६८ जणांचे लसीकरण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील १२ हजार ५०० आणि दुस-या टप्प्यात १० हजार ५०० अशा एकूण २३ हजार लसींचा साठा सध्या आरोग्य विभागाकडे आहे. 
  • लसीकरणात वाढ करण्यासाठी आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले आहे. यात प्रामुख्याने आरोग्य कर्मचा-यांचे समुपदेशन करण्यावर भर देण्यात आला आहे.  
     

दर दिवसाच्या लसीकरण उद्दीष्टानंतर ठरवले जाते रँकिंग (संदर्भ: २८ जानेवारी)

धुळे -१११ %
नाशिक-८९.०९%
नंदुरबार-७७.००
जळगाव-६१.०८%
अ.नगर-६०.२६%

जिल्ह्यात लसीकरण करण्यासाठी तीन नवीन सेंटर्स काढले आहेत. दर दिवशी ७०० जणांचे लसीकरण होईल असे नियोजन केले आहे. लसीकरण वाढवण्यासाठी सर्वच स्तरावरुन प्रयत्न करत आहोत. 
-डाॅ. एन.डी.बोडके,
जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार.

Web Title: Employees became aware of vaccination, Nandurbar got third place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.