गुन्ह्याच्या निषेधार्थ कर्मचा:यांचे काळ्या फिती लावून कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:11 PM2019-02-08T12:11:12+5:302019-02-08T12:11:36+5:30
पाच संघटना एकत्र : जिल्हाधिका:यांना निवेदन
नंदुरबार : जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर दाखल गुन्ह्यला वेगळे वळण मिळू लागले आहे. विविध पाच संघटनांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत गुरुवारी काळ्या फिती लावून काम केले. तसेच गुन्हा दाखल करून घेणारे पोलीस अधिकारी व संबधीत फिर्यादी यांच्यावरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा एका महिला कर्मचा:याच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे. याविरोधात आदिवासी महासंघ, महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन, सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारीका संघटना, एकलव्य आदिवासी युवा संघटना व महाराष्ट्र राजपत्रीत वैद्यकीय अधिकारी संघटना यांनी एकत्र येत जिल्हाधिका:यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, संबधीत तक्रारदार यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी महिला तक्रार निवारण समिती अर्थात विशाखा यांच्याकडे वर्ग करणे आवश्यक होते.
शासकीय अधिकारी व कर्मचा:यांवर गुन्हा अथवा खटला दाखल करतांना आधी संबधीत विभाग प्रमुखांची परवाणगी घेणे आवश्यक असते. तसे या प्रकरणात घडले नाही. त्यामुळे संबधीतांचीही चौकशी झाली पाहिजे असेही या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी झाली नाही तर शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटना व सामाजिक संघटना बंद पुकारणार आहेत असेही या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
याशिवाय जिल्हा रुग्णालयातील दोन्ही महिला कर्मचा:यांवर कारवाईचीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर पाचही संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.