विविध मागण्यांसाठी कर्मचा:यांनी केले मुंडन आंदोलन : खेतिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:13 PM2018-02-27T12:13:44+5:302018-02-27T12:13:44+5:30
राज्य सरकारी कर्मचा:यांचा दर्जा देण्याची मागणी
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 27 : आपल्या विविध मागण्यांसाठी खेतिया व राखी बुद्रुक येथील आदिम जाती सेवा सहकारी संस्थेच्या कर्मचा:यांनी सोमवारी मुंडन आंदोलन केल़े गेल्या 21 फेब्रुवारीपासून या कर्मचा:यांचे आंदोलन सुरु आह़े परंतु याची दखल घेतली न गेल्याने सोमवारी कर्मचा:यांच्या असंतोषाचा उद्रेक झाला़
मध्यप्रदेश सहकारीता कर्मचारी संघाच्या आवाहनावर कर्मचा:यांनी काम बंद आंदोलन पुकारले आह़े संस्थेतील कर्मचा:यांच्या प्रमुख मागण्या सरकार जोर्पयत पूर्ण करीत नाही तोर्पयत हे उपोषण सुरुच राहणार असल्याच पवित्रा कर्मचा:यांकडून घेण्यात आला़
दरम्यान, समिती कर्मचा:यांना केडर, वेतनमान, स्थानांतरण निती लागू करण्यात यावी, संगणक कर्मचा:यांच्या सेवा नियमामध्ये समाविष्ट करण्यात यावे, कर्मचा:यांना राज्य शासनाच्या कर्मचा:यांचा दर्जा देण्यात यावा आदी मागण्यांचा यात समावेश आह़े
या दरम्यान, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश नाहर, काँग्रसेचे जिल्हाउपाध्यक्ष रामकृष्ण पाटील, सरपंच संघाचे अध्यक्ष अरविंद डुडवे, नगरसेवक अनिल चौधरी, राकेश चौधरी आदी उपस्थित होत़े
शासनाने लवकरात लवकर निर्णय घेत कर्मचा:यांच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा या वेळी कर्मचा:यांकडून देण्यात आला आह़े