नंदुरबारातील दुर्गम भागात ‘सरदार’ देतोय रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:41 PM2017-12-26T12:41:44+5:302017-12-26T12:41:50+5:30

Employment provided 'Sardar' in remote areas of Nandurbar | नंदुरबारातील दुर्गम भागात ‘सरदार’ देतोय रोजगार

नंदुरबारातील दुर्गम भागात ‘सरदार’ देतोय रोजगार

Next

भूषण रामराजे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सिताफळ आणि आंबा उत्पादनातून फलोत्पादनाची कास धरणा:या धडगाव तालुक्यातील युवकांना ‘सरदार’ या पेरूने रोजगार मिळवून दिला आह़े तालुक्यातील 35 बागांमध्ये सध्या पेरूच्या कमरेएवढय़ा झाडांना असंख्य पेरू लगडले असून या पेरूंची बाजारपेठ दररोज काकर्दा ता़ धडगाव येथे भरत आह़े 
कृषी विभागाने गेल्या पाच वर्षात धडगाव तालुक्यात फळझाडांचे वाटप केले होत़े सातपुडय़ातील खडकाळ जमिन आणि समतोल हवामानात पेरू झाडांची लागवड केल्यास उत्पादन चांगले येईल, यावर संशोधन करून ‘लखनौ 49’ जातीच्या सरदार या पेरू झाडांची लागवड करण्यात आली होती़ गावपाडय़ावरील खडकाळ माळरान, शेतबांध, पडीक जमिनी, वनक्षेत्राच्या लगतचे पट्टे यासह परसबागेत या झाडांची लागवड झाली होती़ गेली दोन वर्षे संगोपनस्थितीत असलेल्या या पेरू झाडांना यंदा असंख्य पेरू लगडले आहेत़ या पेरूंना म्हणावी तशी बाजारपेठ नसल्याने काकर्दा या गावातील शहादा-धडगाव रस्त्यावर त्यांची विक्री होत आह़े येणा:या-जाणा:या नोकरदार आणि प्रवासींकडून हा गोडमेवा खरेदी होत असल्याने दिवसभरात प्रत्येक युवक 20 किलोचा एक कॅरेट विक्री करून हाताशी पैसे जमवत आह़े  
कृषी विभागाने आदिवासी युवक आणि शेतक:यांच्या सहकार्याने तयार केलेल्या 35 बागांमध्ये हे उत्पादन आले आह़े महिनाभर सुरू राहणा:या या उत्पादनाला योग्य ती बाजारपेठ नसल्याने काकर्दा गावातील मुख्य रस्त्यावर उभे राहून युवक 40 रूपये किंवा त्यापेक्षा कमी दरात विक्री करत आहेत़ येथे उत्पादित होणा:या पेरूंची खरेदी करण्यासाठी धडगाव कृषी कार्यालयाच्या माध्यमातून व्यापा:यांना पाचारण करण्यात आले होत़े या व्यापा:यांचा अल्प प्रतिसाद असल्याने पेरू उत्पादक धडगाव आणि लगतच्या परिसरात जाऊन पेरू विक्री करत आहेत़ साधारण पेरूपेक्षा वजनाने जड आणि आकाराने मोठय़ा अशा या पेरूचा रंग हा पारंपरिक हिरव्या रंगापेक्षा अधिक गडद आणि चवीला गोड असल्याने त्याला शहरी भागात पसंती मिळू शकत़े संपूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने लागवड केलेली झाडे कोणत्याही रासयनिक खतांविनाच संगोपन करून आलेल्या फळांना प्रवाशांकडून मागणी आह़े एकावेळी 1 किलो किंवा त्यापेक्षा अधिक फळे घेऊन जाणा:यांची संख्या अधिक आह़े या फळाला बाजारपेठ मिळाल्यास सातपुडय़ात फलोत्पादनाची योजना पूर्णपणे अंमलात येऊन रोजगार निर्मिती होणार असल्याचे सांगण्यात येत आह़े
 

Web Title: Employment provided 'Sardar' in remote areas of Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.