रिक्त जागांमुळे डोकेदुखी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 10:33 AM2017-08-28T10:33:05+5:302017-08-28T10:33:05+5:30

आंतरजिल्हा शिक्षक बदली : साडेचारशे शिक्षकांची कमरता, प्रक्रिया रखडल्याचा परिणाम

 Empty spots have increased headaches | रिक्त जागांमुळे डोकेदुखी वाढली

रिक्त जागांमुळे डोकेदुखी वाढली

Next
ठळक मुद्दे दुर्गम भागात थेट नियुक्ती.. सुरुवातीला जे शिक्षक आंतरजिल्हा बदलीने आले त्यांना थेट दुर्गम भागातील शाळांवर नियुक्ती देण्यात आली. यापुढे देखील जेही शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येतील त्यांना दुर्गम भागातील शाळांमध्येच नियुक्ती देण्याचा निर्णय जिल्हा


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आंतरजिल्हा बदलीमुळे आणि आधीच रिक्त असलेल्या जागा अशा जवळपास साडेचारशे प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांची डोकेदुखी कायमच आहे. इतर जिल्ह्यातून बदली होऊन येणा:या शिक्षकांना अद्यापही त्या त्या जिल्ह्यातून कार्यमुक्त केले जात नसल्यामुळे जिल्ह्यातील रिक्त जागांचा प्रश्न सुटत नसल्याची स्थिती आहे. महिनाभरापासून शिक्षण विभाग या प्रश्नाला तोंड देत आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षक संख्येची डोकेदुखी कायमच राहिली आहे. मध्यंतरी अर्थात गेल्या चार ते पाच वर्षापासून शिक्षक भरती प्रक्रियाच राबविली गेली नसल्यामुळे रिक्त जागांची संख्या वाढली आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यांपूर्वी आंतरजिल्हा बदलीची ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातील जवळपास 178 प्राथमिक शिक्षकांना आंतरजिल्हा बदली आदेशान्वये कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे रिक्त जागांची संख्या तब्बल 490 वर गेली. मध्यंतरी ऑफलाईनने काही शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्यानंतर त्यांना सामावून घेण्यात आल्याने रिक्त जागांची संख्या साडेचारशेर्पयत खाली आली आहे. जिल्ह्यात प्रथमच एवढय़ा मोठय़ा संख्येने शिक्षकांच्या रिक्त जागा झाल्याने समस्या वाढली आहे.
कार्यमुक्तची घाई
जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात बदलीने जाणा:या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची घाई जिल्हा परिषद प्रशासनाला झाली होती. वास्तविक इतर जिल्ह्यातून किती शिक्षक येऊ शकतील, ते कधीर्पयत येतील त्यानंतरच जिल्ह्यातील शिक्षकांना कार्यमुक्त करणे आवश्यक होते. तशी मागणी जिल्हा परिषदेच्या पदाधिका:यांनी देखील केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत प्राथमिक शिक्षण विभागाने तडकाफडकी निर्णय घेत 178 शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश देवून टाकले. त्याबाबत नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. 
बदलीचा दुसरा लॉट रखडला
आतंरजिल्हा बदलीचा दुसरा लॉट रखडला आहे. पहिल्या लॉटनंतर आठ ते 12 दिवसात दुसरा लॉट काढून बदली प्रक्रिया राबविण्यात येणार होती. त्यामुळे लागलीच अशा शिक्षकांचे समायोजन करून रिक्त जागा भरून काढण्याचे नियोजन प्राथमिक शिक्षण विभागाचे होते. परंतु दुसरा लॉट हा राज्यस्तरावरूनच रखडल्याने समस्या निर्माण झाली आहे. परिणामी शिक्षण विभागाला शिक्षकांचे नियोजन करतांना कसरत करावी लागत आहे. 
शिक्षकांवर ताण
या सर्व प्रकारामुळे अनेक ठिकाणच्या शाळा या द्विशिक्षकीवरून एकशिक्षकी झाल्या आहेत. एका शिक्षकावर तीन ते चार वर्गाचा भार आला आहे. शिक्षकांअभावी एकही शाळा बंद नसल्याचे प्रशासनाचे म्हणने असले तरी रिक्त जागांमुळे मात्र विद्याथ्र्याचे नुकसान होत आहे. 
400 शिक्षक येणार
आंतरजिल्हा बदलीचा दुसरा लॉट लागलीच झाल्यास किमान 400 शिक्षक जिल्ह्यात येणार आहे. त्यात विदर्भ, मराठवाडासह कोकणातील अनेक जिल्ह्यांमधील शिक्षकांचा समावेश आहे. लगतच्या जिल्ह्यातील काही शिक्षकांना आधीच सामावून घेण्यात आलेले आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याच जिल्ह्यात नोकरी करण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या शिक्षकांना ते सोयीचे झाले आहे. 
यापूर्वी आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांना मोठय़ा प्रमाणावर कष्ट घ्यावे लागत होते. आता मात्र, ते सर्व टळले असल्याने समाधान व्यक्त होत आहे

Web Title:  Empty spots have increased headaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.