लाभार्थीचा बीडीओंना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:36 AM2017-10-04T11:36:55+5:302017-10-04T11:37:03+5:30
पंतप्रधान आवास योजना : कन्साई गावातील फक्त तीनच जणांची निवड झाल्याने नाराजी वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थी निवडीत फक्त तीनच जणांची निवड झाली व सुमारे 400 कुटुंब त्यापासून वंचित आहेत. सरपंच व ग्रामसेवकांच्या हेकेखोरपणामुळे लाभार्थी योजनेपासून वंचित राहिले असल्याचा आरोप करून वंचित लाभार्थीनी मंगळवारी पंचायत समितीच्या गटविकास अधिका:यांना घेराव घातला.
पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी शहादा तालुक्यातील कन्साई ग्रुपग्रामपंचायतीअंतर्गत येणा:या 10 गावांचा 2011 च्या जनगणनेनुसार सव्रे करण्यात आला होता. यापैकी ग्रामपंचायतीचे मूळगाव कन्साई सोडले तर लिंबर्डी, जुनी लिंबर्डी, केवडापाणी, लहान भेंगापाणी, निंबर्डी, नवागाव या गावात सुमारे 400 घरकूल मंजूर झाले आहेत. मात्र कन्साई गावातील सुमारे 400 कुटुंब या योजनेपासून वंचित आहेत. याबाबत लाभार्थीनी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या मात्र त्यांच्या तक्रारीकडे हेतूत: दुर्लक्ष केले. 15 ऑगस्ट 2016 रोजी झालेल्या ग्रामसभेत याबाबत ग्रामसेवकाने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. या ग्रा.पं.अंतर्गत येणा:या इतर गावांमधील लाभार्थीना घरकूल मंजूर झाले. मात्र कन्साई गावातील अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिल्याने त्यांच्यात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कन्साई ग्रा.पं.चे सरपंच व ग्रामसेवक यांना लाभार्थीनी घरकूल योजनेच्या लाभाबाबत वारंवार कळवूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने अनिल ठाकरे, अनिल वळवी, जगदीश पवार, केशव ठाकरे, करण वळवी, विष्णू मोरे, पंकज पाडवी, महेंद्र पवार, दीपक पवार, रवींद्र मोरे, संजय कोतवाल, किसन मंदील, कृष्णा मोरे, मंगल ठाकरे, राजेश सोनवणे, सुनील ठाकरे, व सुनील पवार यांनी मंगळवारी गटविकास अधिकारी श्रीराम कागणे यांना घेराव घातला. या वेळी वंचित लाभार्थी व ग्रामस्थांनी घरकूल योजनेचा लाभ मिळत नसल्याची कैफियत मांडून चर्चा केली. ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून वंचित लाभार्थीना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी कागणे यांनी दिले