खांडबारा येथे अतिक्रमणाच्या वादातून जमावाची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:14 PM2017-10-27T12:14:11+5:302017-10-27T12:14:11+5:30
विसरवाडी पोलीसात गुन्हा : खांडबारा येथे झाली घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे शासकीय जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी तक्रार केली़ यातून अतिक्रमण काढले गेल्याचा राग धरून जमावाने तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली़ बुधवारी रात्री उशिरा याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़
हाजीभाई व तय्यब अरेबियानी यांनी खांडबारा ग्रामपंचायतीच्या मालकीच्या बर्डीपाडा भागातील जागेवर अतिक्रमण करून घराचे कंपाउंड बांधकाम केले होत़े याविरोधात फारूख युसूफ मेमन यांनी नवापूर तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता़ यामुळे 10 महिन्यांपूर्वी हे अतिक्रमण काढण्यात आले होत़े याचा राग मनात धरून बुधवारी दुपारी रियाज हाजीभाई अरेबियानी, इलियास हाजीभाई अरेबियानी, जुबेर हाजीभाई अरेबियानी, हाजीभाई ईब्राहिमभाई अरेबियानी, तय्यब हबीब अरेबियानी, फिरोज तय्यब अरेबियानी, अल्ताफ तय्यब मेमन, रफिक हारूण मेमन, आदिल रफिक मेमन, दानिश रफिक मेमन, साहिस्ताबी आदिल मेमन, अफसानाबी जुबेर मेमन, तबस्सुम अल्ताफ मेमन, यास्मिन रियाज मेमन, ईरफानाबी ईलियास मेमन, हमिदाबी तय्यब मेमन यांनी विविध हत्यारे घेत खांडबारा गावातील मेमन यांच्या दुकानावर हल्लाबोल केला होता़ यावेळी दुकानात हजर असलेले फारूख युसूफ मेमन, उस्मान युसूफ मेमन व यासिन मेमन या तिघांना बेदम मारहाण करण्यात आली़ दरम्यान हाजीभाई अरेबियानी यांनी फारूख मेमन याच्या गुप्तांगावर लाथ मारून गंभीर जखमी केल़े
याबाबत फारूख मेमन यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 16 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े जखमींवर उपचार सुरू आह़े