दहावी निकालाआधीच अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:59 PM2019-06-03T12:59:06+5:302019-06-03T12:59:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुणांची अट आणि दहावी परीक्षा लागण्याच्या आधीच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गुणांची अट आणि दहावी परीक्षा लागण्याच्या आधीच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. नंदुरबार येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात यासंदर्भात मोठय़ा प्रमाणावर जनजागृती केली जात असून विद्याथ्र्याना ही चांगली संधी चालून आली आहे.
दहावीचा निकाल लागल्यानंतर अभियांत्रिकी अर्थात पॉलिटेकिAक महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. परंतु यंदा या सर्व बाबींना फाटा देत निकाल लागण्याच्या आधीच ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नंदुरबार येथे गेल्या सहा वर्षापासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू आहे. या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा शासनाने पुरविल्या आहेत. पूर्वी प्राध्यापक आणि प्रयोगशाळांची कमतरता होती ती देखील गेल्या वर्षापासून पुर्ण करण्यात आली आहे. यामुळे या शासकीय महाविद्यालयाकडे विद्याथ्र्याचा कल वाढत आहे.
यंदा तंत्रशिक्षण संचालनालयाने किमान 50 गुणांची अट रद्द केली आहे. निकाल लागला नाही तरी विद्याथ्र्याना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येणार आहे. निकालानंतर ऑनलाईन गुणांचे अपडेट्स टाकता येणार आहे.
18 जूनर्पयत अर्ज भरता येईल. एकुण प्रक्रिया 14 ऑगस्टर्पयत चालणार आहे. शासकीय शुल्क देखील अत्यल्प ठेवण्यात आले आहे. महाविद्यालयात देखील प्रवेशासंदर्भात काऊंटर सुरू करण्यात आल्याची माहिती प्राचार्य परदेशी यांनी दिली.