सारंगखेडा यात्रोत्सवात रंगणार अश्वशर्यती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:02 PM2019-12-10T12:02:38+5:302019-12-10T12:02:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : जातीवंत घोड्यांचा बाजार अशी ओळख असलेल्या सारंगखेडा यात्रोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे़ यानिमित्ताने यंदाही ...

Equestrian race to be played at Sarangkheda Yatra | सारंगखेडा यात्रोत्सवात रंगणार अश्वशर्यती

सारंगखेडा यात्रोत्सवात रंगणार अश्वशर्यती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : जातीवंत घोड्यांचा बाजार अशी ओळख असलेल्या सारंगखेडा यात्रोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे़ यानिमित्ताने यंदाही येथे चेतक फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले असून यासाठी देशभरातील अश्वप्रेमी दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे़ दरम्यान येथील घोडेबाजारात उलाढाल सुरु झाली असून यंदाही अश्वशर्यती आणि विविध स्पर्धांद्वारे घोड्यांची पारख होणार आहे़
सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवानिमित्त जागतिक दर्जाचा चेतक महोत्सव आयोजित करण्यात येतो़ येथील ऐतिहासिक अशा घोडेबाजाराला ४०० वर्षांचा इतिहास आहे़ उमदे आणि जातीवंत घोडे अशी या बाजाराची खासियत आहे़ शेतकऱ्यांची यात्रा असल्याचीही ओळख या सारंगखेडा यात्रेची आहे़ यात शेती औजारे आणि शेतीपूरक साहित्याचीही येथे खरेदी विक्री होते़ येथे भरणाºया चेतक फेस्टीवलनिमित्त देशाच्या कानाकोपºयातून पर्यटक व भाविक याठिकाणी हजेरी लावत असल्याने प्रशासनाकडून यंदाही तयाºया पूर्ण करण्यात आल्या आहेत़ यात प्रामुख्याने पोलीस दलाने सुरक्षेच्या दृष्टीने यंदा कठोर पावले उचचली असून जागोजागी सीसीटीव्ही, कंट्रोल रुम, बॅरीकेटींग यासह रस्ते वाहतूकीचे नियमन करण्यात आले आहे़ यात्रा काळात दोंडाईचा-शहादा दरम्यान होणाºया अवजड वाहतूकीचे नियोजन दोन दिवसांनी सुरु केले जाणार असल्याने अनरदबारी परीसरात तपासणी नाका तयार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़
दोन दिवसांनंतर यात्रोत्सव सुरु होणार असला तरी घोडेबाजारातील व्यवहार सुरु झाल्याने गर्दी वाढू लागली असल्याचे चित्र सध्या येथे आहेत़ घोड्यांच्या या बाजारासोबतच घोडे आणि पाळीव जनावरांसाठी लागणाºया साधनांचीही येथे मोठी बाजारपेठ भरते़ घोड्याच्या खोगीरासह सजावटीचे साहित्य तसेच बैला आणि दुधाळ जनावरांसाठी लागणारे दोर व सजावटीच्या सामानाचा त्यात समावेश आहे़ या साहित्याची विक्री करण्यासाठी जळगाव जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यातील कुशल विक्रेते येथे दाखल होत आहे़ या बाजारातील साहित्य खरेदी विक्रीतून दहा दिवसात लाखोंची उलाढाल होते़ यासोबतच विविध संसारोपयोगी साहित्य विक्रेतेही येथे दुकाने सजवण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले़ यंदा यात्रेच्या पहिल्याच दिवशी किमान ५० हजाराच्या जवळपास भाविक हजेरी लावणार असल्याने तयारीला वेग देण्यात आला आहे़ यात्रेतील घोडेबाजार आकर्षण ठरत आहे़ घोडेबाजाराला भेट देणाºया पर्यटकांच्या सोयीसाठी यंदाही टेंट व्हिलेजचीही निर्मिती करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहेत़ तापी नदी काठावर उभारल्या जाणाºया ३० टेंटमध्ये येथे भेटी देणाºया ार्यटकांसाठी पंचतारांकित सोयी सुविधा करुन देण्यात येणार आहेत़ त्यादृष्टीने कामकाजाला गती देण्यात आली आहे़ येथे मुक्कामी थांबवणाºया पर्यटकांना सोयी सुविधा देण्याकरिता कामकाज वेगाने सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे़ १२ तारखेपासून हे खुले करण्यात येणार आहेत़

यात्रोत्सव सुरु होण्यास अद्याप दोन दिवसांचा अवधी असला तरी घोडे खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु झाले आहेत़ आज अखेरीस दोन हजार घोड्यांची आवक झाल्याची माहिती देण्यात आली आहे़ सोमवारी दिवसभरात येथे ९ घोड्यांची व्रिकी करण्यात आली़ यातून १३ लाख ८५ हजार रुपयांची उलाढाल झाली आहे़ सोमवारी कोल्हापूर येथील अश्वशौकिन संतोष भोकरे यांनी बरेली येथील लईक मोहम्मद यांचा घोडा ५ लाख ५५ हजारात खरेदी केला़ याठिकाणी मारवाड, पंजाब, काठियावाडी या प्रजातीचे घोडे दाखल झाले आहेत़ तिन्ही प्रजातींच्या घोड्यांना खरेदीदारांची विशेष पसंती असते़ यातही पंजाब प्रांतातून येणाºया ‘नुकरा’ या घोड्याला विशेष मागणी असते़ याठिकाणी नुकरा घोडे घेण्यासाठी खरेदीदार हजेरी लावून त्याची खरेदी करतात़

सारंगखेडा यात्रोत्सवात देशातील पर्यटकांसोबतच खान्देशातील पर्यटक हजेरी लावतात़ खाजगी वाहनाने तसेच एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये हे प्रवासी सारंगखेड्यापर्यंत प्रवास करतात़ त्यांच्या सोयीसाठी महामंडळाने यंदाही ५० बसेसची सोय केली आहे़ यातील एकट्या २० बसेस ह्या शहादा बसस्थानकातून वेळोवेळी सोडल्या जाणार आहेत़ तर उर्वरित ३० बसेस ह्या शिरपूर, धुळे, दोंडाईचा, शिंदखेडा, नंदुरबार बसस्थानकातून सोडण्यात येतील़ यासाठी योग्य ते नियोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़

एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी येथे भाविक येणार असल्याने मंदिर ट्रस्टच्यावतीने सोयींवर भर देण्यात आला आहे़ यात तुला करण्यासाठी स्वतंत्र जागा, प्रामुख्याने सीसीटीव्ही, नारळ फोडण्यासाठी जागा, भाविकांसाठी बॅरकेटिंग करण्यात आले आहे़ मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन पाटील, उपाध्यक्ष रविंद्र पाटील व सचिव भिकन पाटील यांच्या मार्गदर्शनात कामकाज सुरु आहे़
दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर ११ रोजी पहाटेपासून धार्मिक कार्यक्रम दत्तमंदिरात सुरु होतील़ यात पहाटे चार वाजता देवाला मंगळस्रान, सायंकाळी ४ वाजता महापूजा, ६ वाजता महाआरती तर सात वाजता पालखी मिरवणूकीला सुरुवात होणार आहे़ रात्री १२ पर्यंत सारंगखेडा गावात ही मिरवणूक काढली जाईल १२ रोजी पहाटे मिरवणूकीचा समारोप होईल़
 

Web Title: Equestrian race to be played at Sarangkheda Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.