दोन कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:20 PM2019-08-13T12:20:17+5:302019-08-13T12:20:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गेल्या आठवडय़ात झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यात  सुमारे दोन कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज ...

An estimated loss of two crores | दोन कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज

दोन कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : गेल्या आठवडय़ात झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यात  सुमारे दोन कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज  आहे. तालुक्यात लहान-मोठय़ा तीन हजार घरांचे नुकसान तर दोन  व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पाऊस थांबल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असून महसूल व कृषी विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामास गती आली  आहे.
गेल्या आठवडाभर शहादा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरासह संपूर्ण तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते. सलग तीन दिवस संततधार झालेल्या पावसाने गोमाई नदीला दोनवेळा पूर आला. तालुक्यातील नद्या-नाले भरभरुन वाहू लागले. या पावसाने संपूर्ण तालुका जलमय होऊन तालुक्यात हाहाकार माजला.  दोन व्यक्तींसह तालुक्यात लहान-मोठी 40 जनावरे मृत्यूमुखी पडली तर सुमारे तीन हजार घरांची पडझड झाली. सुमारे साडेचार ते पाच एकर क्षेत्रातील शेतीत पावसाचे पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकंदरीत तालुक्यात सुमारे दोन कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आठवडाभरानंतर शहादेकरांना सोमवारी सूर्यदर्शन झाले. पाऊस थांबल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून अजूनही शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचले आहे. ज्या नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते त्यांच्याकडून घराची साफसफाई सुरु झाली आहे. तालुक्यातील अनेक रस्त्यांची पावसामुळे दुरावस्था झाल्याने अजूनही तालुक्यातील रहदारी  सुरळीत झालेली नाही. पावसामुळे शहादा शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे झाल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांची डागडुजी करणे व साचलेले पाणी त्वरित काढणे आवश्यक आहे. अन्यथा साचलेल्या पाण्यामुळे शहरात साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

4शहादा तालुक्यातील रायखेड येथे घराची भिंत पावसात कोसळून कलाबाई रायसिंग भिल या 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर पाडळदे येथे सुखराम बाबुराव ठाकरे या 35 वर्षीय व्यक्तीचा तलावात बुडून मृत्यू झाला होता. या दोघांच्या कुटुबीयांना शासनातर्फे प्रत्येकी चार लाखाचे अनुदान देण्यात येणार आहे. 
4शहादा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतात पावसाचे पाणी साचल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील सुमारे साडेचार ते पाच हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. सोमवारी पाऊस थांबल्याने महसूल व कृषी विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. 

कवळीथजवळील बंधारा फुटल्याने पाटचा:या बंद

शहादा : तालुक्यातील अनेक गावांना पाटचारीतून पाणी वाहून नेणा:या कवळीथ येथील ब्रिटिशकालीन बंधारा फुटल्याने तालुक्यातील पाटचारींचे पाणी बंद झाले. कवळीथ, ता.शहादा येथे सुकनाई, खापरी व गोमाई  नदीच्या संगमावर ब्रिटिशकालीन बंधारा आहे. सुमारे 300 फुट रुंद व 20 फुट उंच असलेल्या या बंधा:यात मोठय़ा प्रमाणात पाणी साठते. बंधा:याला एक मुख्य पाटचारी असून त्यापासून पुढे चार पाटचारीद्वारे डोंगरगाव,               सोनवद, कौठळ त.श, मोहिदा त.श, वरूळ कानडी,   टेंभे त.श., लोणखेडा, मलोणी, शहादा, कुकडेल,   मनरद, लांबोळा, करजई, बुपकरी, डामरखेडा या शिवारातील शेकडो एकर शेतीच्या सिंचनासाठी वापरले जाते. यासोबतच डोंगरगाव, सोनवद, वरूळ कानडी व मोहिदे येथील तलाव भरण्यासाठीही या पाण्याचा उपयोग होतो. सन 2013 मध्ये या बंधा:याच्या पाटचारींची दुरूस्ती करण्यात आली होती तर दोन वर्षापूर्वी बंधारा व पाटचारीतील गाळ काढण्यात आला होता. गेल्या आठवडय़ात झालेल्या जोरदार पावसाने गोमाई नदीला मोठा पूर आल्यामुळे पुराच्या प्रवाहात बंधा:यातील पाटचारीकडील सुमारे बारा फुट लांब व दहा फुट उंचीची दगडी भिंत वाहून गेली. त्यामुळे पाटचारींचे पाणी पूर्णत: थांबले आहे. बंधा:याच्या पाटचारींचा पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने तालुक्यातील अनेक गावात आता भर पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. 2013 साली बंधा:याची दुरुस्ती झाली असताना अवघ्या पाच-सहा वर्षात बंधा:याची भिंत कोसळल्याने शेतक:यांनी बंधा:याच्या दुरूस्तीचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप केला आहे. 

मनरद व लांबोळा शिवारातील पिकांचे
पाटचारीतील घाण पाण्यामुळे नुकसान


शहादा तालुक्यातील लांबोळा व मनरद येथील शेतात शहादा शहराकडून येणा:या पाटचारीचे घाण पाणी घुसून शेतीचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप शेतक:यांकडून होत आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीने शहादा शहरातील पाटचारींचे पाणी शहराच्या वेगवेगळ्या भागात पसरले होते. वसाहतींमधील गटारी व साचलेले घाण पाणी पाटचारीतून पुढे  मनरद व लांबोळा येथील शेतात घुसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार अनेक शेतक:यांनी केली आहे. लांबोळा येथील दरबारसिंग रावल, योगेंद्रसिंग  रावल, राजेंद्र पाटील, गणेश पाटील, जशीबाई पाटील, परमानंद पाटील, कल्याण पाटील, घन:श्याम पाटील, रमण पाटील, काशिनाथ पाटील, सखाराम पाटील, जितेंद्र पाटील, पदम पाटील, रमेश पाटील, मोहन पाटील, सतीश पाटील, अंबालाल पाटील, दिलीप पाटील, सुदाम कोळी आदी शेतक:यांनी शेतीचे नुकसान झाल्याचा आरोप केला आहे.

Web Title: An estimated loss of two crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.