विवाह मुहूूर्त टळूनही अखेर नवरदेव आलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:41 PM2019-11-30T12:41:02+5:302019-11-30T12:41:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ठरल्याप्रमाणे लगAाची सर्व तयारी झाली असतांना नवरदेव व व:हाडी मंडळीच आली नाही, हिरमुसल्या चेह:याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ठरल्याप्रमाणे लगAाची सर्व तयारी झाली असतांना नवरदेव व व:हाडी मंडळीच आली नाही, हिरमुसल्या चेह:याने वधूकडील मंडळींना सर्व तयारीवर पाणी सोडावे लागले. परंतु नगरदेव आणि त्याच्या नातेवाईकांना धडा शिकविण्यासाठी वधू पित्याने तडक पोलीस ठाणे गाठून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. शहादा येथे ही घटना 28 रोजी घडली. नवरदेव अकोला येथील आहे.
शहादा येथील युवतीचा आकाश रमेश गुन्नलवार, रा.गितानगर, अकोला या युवकाशी विवाह ठरला होता. जुलै महिन्यात त्यासंदर्भात बोलणी झाली होती. ठरल्याप्रमाणे विवाहाची खरेदी आणि इतर तयारी वधूकडील मंडळींनी केली होती. लगA पत्रिका देखील वाटल्या गेल्या. गुरुवार, 28 नोव्हेंबर ही विवाहाची तयारी निश्चित झाल्याने विवाहाची तयारी करण्यात आली. विवाहासाठी नातेवाईक मंडळी दाखल झाली. ठरल्याप्रमाणे नवरदेवाची वरात येईल या समजुतीत वधूकडील मंडळी होती. परंतु विवाह मुहूर्त जवळ येवूनही वरात काही येत नव्हती. घटिका मुहूर्त टळूनही वरात व नवरदेवही आला नाही. सायंकाळर्पयत वाट पाहूनही नवरदेव आणि वरात किंवा त्यांच्याकडील नातेवाईक न आल्याने वधूकडील मंडळींचा हिरमोड झाला. व्अखेर आपण फसविलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर वधू पित्याने तडक पोलीस ठाणे गाठले.
नवरदेव आकाश रमेश गुन्नलवार, राजेंद्र देवराम गुन्नलवार, चंद्रकांत रमेश गुन्नलवार सर्व रा.अकोला तर अजय गुलाबशेठ कानडे व रुपाली अजय कानडे रा.चोपडा, जि. जळगाव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार फुलपगारे करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेव आकाश गुन्नलवार हा हळदीच्या आदल्या दिवशीच घरून बेपत्ता झाल्याचे तपासी अधिकारी जमादार फुलपगारे यांनी सांगितले. याबाबत त्याच्या नातेवाईकांनी अकोला पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद देखील केली आहे. असे असले तरी वधूची आणि तिच्या पालकांची फसवणूक झाल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.