डिसेंबरअखेर येऊनही 43 टक्के पेरण्या : नंदुरबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:44 PM2017-12-25T12:44:18+5:302017-12-25T12:44:23+5:30
गहू क्षेत्र खालावले : ढगाळ हवामानाची बाधा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात यंदा पिकांवर निर्माण झालेले कीड रोग आणि बोगस बियाण्यामुळे ज्वारी उत्पादकांचे झालेले नुकसान यामुळे आजअखेरीस केवळ 43 टक्के पेरण्या झाल्या आहेत़ गहू, ज्वारी आणि हरभरा वगळता इतर पिकांच्या पेरण्या नाममात्र झाल्या आहेत़
जिल्ह्यात यंदा सरासरी पावसाने हजेरी लावली होती़ वेळावेळी हुलकावणी देत मध्यम स्वरूपात आलेल्या पावसामुळे कापूस, ज्वारी आणि इतर पिकांचे उत्पादन घेण्यास शेतक:यांना काही प्रमाणात यश आले होत़े खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाच कापूस उत्पादक शेतक:यांना बोंड अळी आणि ज्वारी उत्पादकांना बोगस बियाण्यामुळे अनुत्पादकतेचा फटका बसला होता़ परिणाम यंदा रब्बी हंगामाच्या पेरणीवर मोठा परिणाम दिसून येत आह़े जिल्ह्यात 20 डिसेंबर्पयत केवळ 42़ 11 टक्के पेरण्या झाल्या असून सर्वाधिक 48 टक्के पीकपेरा शहादा तालुक्यात झाला आह़े
जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 21 हजार हेक्टरवर घेतला जाणारा गहू केवळ सहा हजार 665 हेक्टरवर पेरण्यात आला आह़े जानेवारीर्पयत या आकडेवारीत वाढ झाल्यास जिल्ह्यात 12 ते 16 हजार रूपयांर्पयत गहू पेरा होण्याची शक्यता आह़े गहू पाठोपाठ सात हजार 64 हेक्टर रब्बी ज्वारी, 1 हजार 445 हेक्टर मका, 14 हजार 421 हेक्टर हरभरा पेरणी करण्यात आला आह़े तब्बल 71 हजार 486 सर्वसाधारण रब्बी क्षेत्रात केवळ 30 हजार 814 हेक्टर पेरणी झाली आह़े यात संथ गतीने वाढ होत असल्याने यंदा रब्बी हंगामात गहू आणि ज्वारी या दोन पिकांव्यतिरिक्त इतर उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े तेलबिया पिकांच्या पेरणीतही अपेक्षित वाढ होत नसल्याने यंदा तेलबिया उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.