मतदानानंतरही उमेदवार कार्यकत्र्याच्या गराडय़ातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 01:13 PM2019-10-23T13:13:43+5:302019-10-23T13:14:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर काही उमेदवारांनी मोबाईल स्वीच ऑफ करून विश्रांती घेतली तर प्रमुख ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर काही उमेदवारांनी मोबाईल स्वीच ऑफ करून विश्रांती घेतली तर प्रमुख उमेदवार मात्र मंगळवारी दिवसभर कार्यकत्र्याच्या गराडय़ातच राहिले.
गेल्या 15 दिवसांपासून सर्वच उमेदवारांनी प्रचारासाठी दिवस-रात्र एक केली. विशेषत: भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार तसेच काही अपक्ष उमेदवारांनी कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच याच ध्येयाने निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे पहाटेपासून तर उत्तररात्रीर्पयत या उमेदवारांनी आपली प्रचार यंत्रणा राबवली. मतदानाचा दिवस उजाडेर्पयत बहुतांश उमेदवारांचा घसा कोरडा झाला होता. त्यामुळे मतदानानंतर सर्वच उमेदवारांचा विश्रांती घेण्याचा मूड असला तरी कार्यकत्र्यानी मात्र त्यांना मतदानानंतरही स्वस्थ बसू दिले नाही.
सर्वच ठिकाणी निवडणुकांमध्ये चुरस झाल्याने सर्वानाच निकालाची उत्सुकता लागून आहे. या पाश्र्वभूमीवर नंदुरबारला डॉ.विजयकुमार गावीत यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच कार्यकत्र्याची गर्दी होती. ग्रामीण भागातील कार्यकर्ते आपल्या गावात किती मतदान झाले, मतदान काढण्यासाठी आपण काय प्रयत्न केले, विरोधकांची काय भूमिका होती हे सांगण्यासाठी गर्दी केली होती. डॉ.गावीत यांनीदेखील कार्यकत्र्याचे म्हणणे ऐकून घेतले.
उदेसिंग पाडवी हे आपल्या तळोदा येथील निवासस्थानी होते. त्याठिकाणीही कार्यकत्र्याची गर्दी होती. नवापुरात भाजपचे उमेदवार भरत गावीत हे दिवसभर आपल्या कार्यालयात बसून होते. एकेक गावांच्या कार्यकत्र्याचे म्हणणे ऐकून घेत होते. सायंकाळी पाच वाजेर्पयत त्यांच्या कार्यालयाजवळ कार्यकत्र्याची गर्दी होती. शिरीष नाईक यांनीदेखील कार्यकत्र्याचे म्हणणे ऐकून घेतले. कार्यकत्र्याचा उत्साह वाढवला.
शहादा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजेश पाडवी हे आपल्या सोमावल येथील निवासस्थानी होते. तेथेही परिसरातील कार्यकत्र्याशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर तळोद्यात काही ठराविक कार्यकत्र्याची भेट घेऊन देवमोगरा मातेच्या दर्शनासाठी रवाना झाले होते. अॅड.पद्माकर वळवी हे आपल्या तळोदा येथील निवासस्थानी होते. त्याठिकाणीही कार्यकत्र्याची गर्दी होती.