रविवारीही गजबजेल आता बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:58 AM2020-10-03T11:58:21+5:302020-10-03T11:58:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबारसह तीन शहरांमध्ये राहणारा रविवारचा जनता कर्फ्यू आता रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ...

Even on Sundays, the market is buzzing | रविवारीही गजबजेल आता बाजारपेठ

रविवारीही गजबजेल आता बाजारपेठ

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबारसह तीन शहरांमध्ये राहणारा रविवारचा जनता कर्फ्यू आता रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता रविवारी देखील नियमित बाजारपेठे सुरू राहणार आहे. मिशन बिगीन अंतर्गत हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. याशिवाय रेस्टॉरंट, बार यांनाही अटी व शर्तीनुसार सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे.
जिल्हा कार्यक्षेत्रात सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट बंद राहतील, तथापि आॅनलाईन शिक्षणास परवानगी राहील. चित्रपट गृहे, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर (मॉल व मार्केट कॉम्प्लेक्समधील) सभागृह, असेंब्ली हॉल यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील. सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मोठ्या संख्येने लोक प्रमाणात घेण्यात येणारे मेळावे किंवा कार्यक्रम प्रतिबंधीत असतील. दुकाने व मार्केट रविवारीदेखील सुरू मॉल आणि व्यावसायिक संकुल (मार्केट कॉम्प्लेक्स), दुकाने, आस्थापना सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहील. औषधांची दुकाने आणि खाजगी रुग्णालये पुर्णवेळ सुरू राहतील. पाचपेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास किंवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद करण्यात येतील.
रविवारीदेखील दुकाने, मार्केट, आस्थापना निधार्रीत वेळेत सुरू राहतील. यापूर्वी परवानगी दिलेल्या बाबी पूर्ववत सुरू राहतील.
हॉटेल/रेस्टॉरंट्स सुरू
५ आॅक्टोबरपासून हॉटेल्स, फूट कोर्ट्स, रेस्टॉरंट्स आणि बार ५० टक्के क्षमतेसह किंवा स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे सुरू राहतील. या आस्थापनांसाठी पर्यटन विभागाकडून स्वतंत्र आदर्श कार्यप्रणाली देण्यात येईल, तिचे पालन करणे बंधनकारक राहील. आॅक्सिजन उत्पादन व वाहतूक करणाºया वाहनांच्या हालचालीस जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे वेळेचे अथवा इतर बंधन असणार नाही.
कामाचे व इतर सर्व ठिकाणी आणि प्रवास करताना चेहºयावर मास्क लावणे अनिवार्य आहे.
 

Web Title: Even on Sundays, the market is buzzing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.