ViDhan Sabha 2019: उदेसिंग पाडवी यांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 12:55 PM2019-10-02T12:55:32+5:302019-10-02T13:18:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा  : बहुप्रतीक्षित सत्ताधारी भाजपची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आल्यानंतर शहादा मतदारसंघातून विद्यामान आमदार उदेसिंग पाडवी ...

Everyone's attention to the role of Udasing Padvi | ViDhan Sabha 2019: उदेसिंग पाडवी यांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष

ViDhan Sabha 2019: उदेसिंग पाडवी यांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा  : बहुप्रतीक्षित सत्ताधारी भाजपची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आल्यानंतर शहादा मतदारसंघातून विद्यामान आमदार उदेसिंग पाडवी यांना पक्षाने उमेदवारी नाकरल्याने  त्याच्या कार्यकत्र्यानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता आमदार पाडवी काय भूमिका घेतात याकडे सा:यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपच्या यादीत नाव न आल्याचे कळताच ते आमदार एकनाथ खडसे यांच्या भेटीला रवाना झाले.
विधानसभेसाठी सत्ताधारी भाजपा-सेना युतीच्या उमेदवार निवडीकडे कार्यकत्र्याबरोबरच विरोधकांचेही लक्ष लागून होते. कारण शहादा मतदारसंघातून आमदार पाडवींबरोबरच त्यांचे पुत्र पोलीस निरीक्षक  राजेश पाडवी, अनुसूचित जमातीचे रूपसिंग पाडवी यांनी उमेदवारीची              मागणी केली होती. याशिवाय पक्ष निरीक्षकांकडे मुलाखतीही दिल्या होत्या.    या उपरोक्त सर्वानीच वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डींग लावल्यामुळे उमेदवारीचे सस्पेंस अधिकच वाढले होते. शेवटी भाजपने मंगळवारी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. आमदार पाडवी यांचे नाव जाहीर न झाल्यामुळे त्यांच्या कार्यकत्र्याना अक्षरश: धक्का बसला. कारण आमदार पाडवी यांनी आपल्या कामाच्या जोरावर निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पिंजून काढला होता. साहजिकच वरिष्ठ नेत्यांनी कामाला लागण्याचे सांगितले होते. मात्र एनवेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने कार्यकत्र्यामध्ये नाराजीचा सूूर व्यक्त होत आहे. पाडवी यांच्याऐवजी त्यांचे पुत्र राजेश पाडवी यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी आमदार पाडवी काय भूमिका घेतात याकडे कार्यकत्र्याचे लक्ष लागून आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दोन दिवस असल्याने काय घडामोडी घडतात याची उत्सुकता लागली आहे.
 

Web Title: Everyone's attention to the role of Udasing Padvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.