सातपुडय़ाच्या जंगलातून पाच किलोमीटर पायी चालून बदलले ईव्हीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:26 PM2019-10-21T12:26:00+5:302019-10-21T12:26:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा मतदारसंघातील त्रिशुल ता़ धडगाव येथील मतदान केंद्रातील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर राखीव पथकाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा मतदारसंघातील त्रिशुल ता़ धडगाव येथील मतदान केंद्रातील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर राखीव पथकाने जंगलातून वाट काढत पाच किलोमीटर पायी चालून ईव्हीएम बदलून दिल़े
राज्यातील प्रथम क्रमांकाचा मतदारसंघ असलेल्या अक्कलकुवा-धडगाव मतदारसंघात पोलींग बूथ तयार करणे प्रशासनासाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले आह़े रविवारी सातपुडय़ाच्या दुर्गम भागात पोहोचलेल्या कर्मचा:यांनी सोमवारी सकाळी मतदान केंद्रे सज्ज केली होती़ सकाळी सातपासून मतदान सुरु झाल्यानंतर धडगाव तालुक्यातील त्रिशुल-2 मतदान केंद्र क्रमांक 226 अंतर्गत मोजरापाडा येथील केंद्रात लावलेल्या ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानंतर मतदान विभागीय अधिकारी आणि तलाठी यांनी जंगल आणि नदीच्या पाण्यातून वाट काढून त्रिशुल 1 मतदान केंद्रापासून पाच किलोमीटर अंतरावरील मोजरापाडा येथील केंद्र गाठल़े याठिकाणी ईव्हीएम बदलून दिल्यानंतर पूर्ववत मतदान सुरु झाल़े
अक्कलकुवा मतदार संघाचा 70 टक्के भाग हा सातपुडय़ातील अतिदुर्गम भागातील गाव व पाडय़ांचा समावेश असलेला आहे. यात नऊ मतदान केंद्र हे नर्मदा नदीच्या काठावर आणि सरदार सरोवरच्या बॅक वॉटरमध्ये येणारे असल्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे पाण्यातून बोटीद्वारे जावे लागते. त्यात मणिबेली, चिमलखेडी, धनखेडी, मुखडी, डनेल, बामणी, भादल, उडद्या व भाबरी या गावांचा व मतदान केंद्रांचा समावेश आहे. वाहनांप्रमाणेच या बाजर्ला देखील जीपीएस यंत्रणा लावण्यात आली होती. अक्कलकुवा येथून मोलगीमार्गे गमन पॉईंटर्पयत हे कर्मचारी वाहनाद्वारे पोहचले. तेथून नर्मदेच्या बॅकवॉटरमधून ते बाजर्द्वारे रवाना झाले. मतदान झाल्यानंतर देखील परतीचा मार्ग त्यांचा असाच राहणार आहे. भाबरी, उडद्या, भादल या तीन केंद्रांवर जाण्यासाठी मतदान कर्मचा:यांना तीन किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागली.
अक्कलकुवा मतदार संघातील 110 मतदान केंद्रांवर मोबाईल किंवा इतर दूरध्वनी साधनांची जोडणी नसल्यामुळे त्या मतदान केंद्रांना वायरलेस सेटची जोडणी देण्यात आली आहे. त्यासाठी 39 वॉकी टॉकी सेट उपलब्ध झालेली आहेत. होराफळी, धडगाव, व मोलगी या ठिकाणी रिपीटरहुन वॉकी टॉकी सेट नियंत्रित केले जाणार आहेत. या केंद्रांवर रनर ची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.