जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे धुळे, नाशिक शिरपूर, त्र्यंबकेश्वरला परीक्षा केंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:34 PM2020-09-28T12:34:39+5:302020-09-28T12:34:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील पाच हजारापेक्षा अधीक विद्यार्थी यंदा सीईटी परीक्षा देणार आहेत. त्यांचे केंद्र धुळेसह इतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील पाच हजारापेक्षा अधीक विद्यार्थी यंदा सीईटी परीक्षा देणार आहेत. त्यांचे केंद्र धुळेसह इतर ठिकाणी राहणार असल्याने अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केद्रांत जाण्यासाठी जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती एस.टी.तर्फे देण्यात आली.
वाहतूक सेवेअभावी विद्यार्थी सीईटी सामाईक परिक्षेला मुकणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सुचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्या अनुषंगाने एस.टी.महामंडळातर्फे जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १ ते ९ आॅक्टोबर दरम्यान ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी जादा बसेस सोडल्या जातील. नंदुरबार जिल्ह्यातून एकुण पाच हजार २४७ विद्यार्थी सीईटीसाठी बसले आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे धुळे, शिरपूर व नाशिक येथे आहेत. त्यामुळे त्या त्या दिवशी जादा बसेस सोडल्या जातील .
१ आॅक्टोबर रोजी धुळे केद्रावर २८२, नाशिक ३११तर त्र्यंबकेश्वर केंद्रावर ७ परिक्षार्र्थींची सोय करण्यात आली आहे. २ रोजी धुळे येथे ३७४, नाशिक येथे ३६१ तर त्र्यंबकेश्वर येथे १३ परिक्षार्थी, ४ आॅक्टोबर रोजी धुळे येथे ३३८, नाशिक येथे २८१ तर त्र्यंबकेश्वर येथे १६. ६ आॅक्टोबर रोजी धुळे येथे ३२२, शिरपूर येथे ३९, नाशिक येथे ३०५ तर त्र्यंबकेश्वर येथे १६ परिक्षार्थी. ७ आॅक्टोबर रोजी धुळे येथे १३२, शिरपूर येथे ४१, नाशिक येथे ३०८ तर त्र्यंबकेश्वर येथे १५ परिक्षार्थी. ८ आॅक्टोबर रोजी धुळे येथे २५४, शिरपूर येथे ३८, नाशिक येथे ३०४ तर त्र्यंबकेश्वर येथे १२ परिक्षार्थी. ९ आॅक्टोबर रोजी धुळे येथे २६९, शिरपूर येथे ३६, नाशिक येथे ४६१ तर त्र्यंबकेश्वर येथे १५ परिक्षार्र्थींची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
एकुण धुळे येथे २,३५०, नाशिक येथे २,६३८, शिरपूर येथे १५५ तर त्र्यंबकेश्वर येथे १०४ विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील चारही आगारातून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना या बसेसचा फायदा घ्यावा असे आवाहन धुळे विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी केले आहे.
कोरोनामुळे यंदा जिल्ह्यातील परीक्षा केंद्र यंदा रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे धुळे, शिरपूर, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वाहतुकीची साधने उपलब्ध व्हावी यासाठी एस.टी.महामंडळातर्फे १ ते ९ आॅक्टोबरपर्यंत जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.