१० हजार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:36 PM2020-01-22T12:36:42+5:302020-01-22T12:36:49+5:30
वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : अतिवृष्टी व ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, यामुळे समाजातील ...
वसंत मराठे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : अतिवृष्टी व ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, यामुळे समाजातील सर्वच घटक प्रभावीत झाले आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सरसकट परीक्षा शुल्क माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असून, त्यामुळे जिल्ह्यातील १० हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
याबाबत जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांनी उमविच्या या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची अपेक्षा पालकांनी केली आहे. तशी मागणीदेखील केली आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात जुलैच्या अखेरीस सुरूवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्यादेखील लांबल्या होत्या. लांबलेल्या पावसाने सलग हजेरी लावली होती. त्यानंतर थोडीसी उसंत मिळाल्यामुळे शेतकºयांनी जशी तशी पेरणी उरकवून घेतली होती. परंतु पुन्हा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने दमदार सुरूवात केल्यामुळे सलग दोन-तीन महिन्यांपर्यंत जोरदार पडला. या दरम्यान महापुरामुळे शेतकºयांचे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यातून थोडे फार उत्पन्न हाती लागण्याची शक्यता असतांना आॅक्टोबरच्च्या शेवटी पुन्हा अवकाळीने शेतकºयावर घाला घातला. साहजिकच हाता तोंडाशी आलेला घासदेखील नैसर्गिक आपत्तीने हिरावून नेला. परिणामी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकºयांच्या हाती काहीच पडले नाही. अगदी उत्पादनावर केलेला रासायनिक खते, बी-बियाण्यांचा खर्चदेखील निघाला नाही. शेतकºयांचे पूर्णपणे आर्थिक दिवाळे निघाल्यामुळे शेतकरी अक्षरश: कर्जबाजारी झाला आहे. अतिवृष्टी व ओला दुष्काळामुळे खान्देशातील शेतकºयांबरोबरच समाजातील सर्वच घटक प्रभावी झाले आहे. पालकांची अशी खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाने सामाजिक बांधिलकी जपत आपल्या कार्यक्षेत्रातील म्हणजे ५२ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात येणाºया विविध परीक्षांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या यानिर्णयाचा लाभ नंदुरबार, तळोदा, शहादा, धडगाव, नवापूर, अक्कलकुवा या सहा तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार साधारण १० हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
वास्तविक अतिवृष्टी व ओला दुष्काळामुळे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी पूर्णपणे आर्थिक कोंडीत सापडला होता. विद्यापीठाने घेतलेल्या फी माफीच्या निर्णयामुळे पालकांना थोडीशी का होईना आर्थिक मदत मिळाली आहे. परंतु विद्यापीठाच्या निर्णयाची संबंधीत महाविद्यालय प्रशासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी आदिवासी पालकांनी केली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कासाठी अडवून फिरवा फिरव करू नये अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्का बरोबरच कॅप शुल्क, पासिंग सर्टीफिकेट, गुणपत्रक, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, पर्यावरण, जनरल नॉलेज, प्रोजेक्ट, डेझरटेशन इ. प्रकारच्या उपक्रमाचे शुल्क सुद्धा माफ केली आहेत. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज स्विकारताना कुठलीही अट न घालता अर्ज स्विकारून तसे प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठविण्याची सूचना दिली आहे. तथापि रपीक्षा अर्ज विलंबाने सादर करणाºया विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या नियमानुसार विलंब शुल्क आकारणी करण्याचे निर्णयात म्हटले आहे. तथापि विद्यापीठाने लेट फी बाबतही धोरणात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे. कारण अतिदुर्गम आदिवासी भागातील पालक व विद्यार्थ्यांपुढे अनेक अडचणी असतात. त्यामुळे परीक्षा अर्ज भरताना तो वेळेवर उपस्थित राहू शकणार नाही. विद्यापीठाने विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेण्याची मागणी पालकांनी केली आहे.