सीमावर्ती भागात उत्पादन शुल्कची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:25 PM2019-10-07T12:25:12+5:302019-10-07T12:25:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या पाश्र्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सीमावर्ती भागात धाड टाकून 83 ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या पाश्र्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सीमावर्ती भागात धाड टाकून 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़
उत्पादन शुल्कचे विभागीय आयुक्त ओहोळ व अधिक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनात नंदुरबार तालुक्यातील धानोरा, पिंपळोद, खांडबारा येथे पथकाकडून कारवाई करण्यात आली़ यांतर्गत विदेशी मद्याचे 25 बॉक्स, बियरचे 8 बॉक्स, देशी मद्याचे सात बॉक्स आणि 185 लीटर ताडीसह टीएस 05 ईजी 3151 ही दुचाकी जप्त करण्यात आली़ एकूण 83 हजार 494 रुपयांचा मुद्देमाल पथकाकडून जप्त करण्यात आला़ पथकाने मोहन करणसिंग वसावे, दिपक रेगजी वळवी, स्वामी पोंगुला यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई केली़
ही कारवाई निरीक्षक मनोज संबोधी, दुय्यम निरीक्षक एस़क़ेबाविस्कर, योगेश पाटील, योगेश सूर्यवंशी, सहायक दुय्यम निरीक्षक रामसिंग राजपूत, हेमंत पाटील, अजय रायते, हर्षल नांद्रे, अविनाश पाटील यांनी केली़