राष्ट्रीय कर्तव्यात मतदारांचा उत्सफूर्त सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 11:57 AM2019-10-22T11:57:34+5:302019-10-22T11:57:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांसाठी 1 हजार 385 मतदान केंद्रांवर सोमवारी मतदान घेण्यात आल़े सकाळी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांसाठी 1 हजार 385 मतदान केंद्रांवर सोमवारी मतदान घेण्यात आल़े सकाळी सात पासून सुरु झालेल्या या प्रक्रियेत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ‘लोकशाहीचा जागर’ केला़ सातपुडय़ाच्या दुर्गम भागापासून ते थेट शहरी भागातील मतदान केंद्रांर्पयत मतदार स्वच्छेने मतदानासाठी घराबाहेर पडून रांगा लावत असल्याचे चित्र होत़े मतदान प्रक्रियेदरम्यान दिव्यांग, वृद्ध, महिला मतदारांचे विद्याथ्र्यानी केलेले सहाय्य लक्ष वेधून घेणारे ठरले होत़े
नवापुर तालुक्यात उशिरार्पयत मतदान सुरु
नवापुर तालुक्यातील खांडबारा येथे 4 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती़ चारही केंद्रांवर एकूण 5 हजार 2 मतदारांपैकी 2 हजार 886 मतदानाचा हक्क बजावला़ सायंकाळी सहार्पयत येथे 57़70 टक्के मतदान झाले होत़े मतदान केंद्र क्रमांक 51 मध्ये 1 हजार 160 पैकी 671, केंद्र क्रमांक 52 मध्ये 1 हजार 122 पैकी 672, केंद्र क्रमांक 53 मध्ये 1 हजार 260 पैकी 693, केंद्र क्रमांक मध्ये 1 हजार 460 पैकी 850 मतदारांनी मतदान केल़े सकाळी सात वाजेपासून येथे शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली़ नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे पाच मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती़ यात 4 हजार 875 पैकी 2 हजार 438 मतदारांनी मतदान केल़े मतदारसंघातील सर्व 336 मतदान केंद्रांवर सुरळीतपणे मतदान पार पडल्याची माहिती देण्यात आली आह़े नवापुर शहर, नवागाव, धुळीपाडा, धनराट, जुनी व नवी सावरट, शेहीसह विविध मतदान केंद्रांवर सकाळी संथ गतीने मतदान सुरु झाले होत़े दुपारी 2 वाजेनंतर तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी झाली होती़ तालुक्यातील मोठी कडवान येथे रात्री उशिरार्पयत मतदान सुरु होत़े
शहाद्यात सकाळपासून निरुत्साह
शहादा येथे संथ गतीने मतदानाला सुरवात झाली. यातून सकाळी 9 वाजेपयर्ंत फक्त 7.96 टक्के मतदान झाले. काही मतदान केंद्रांवर व्हिलचेअर नसल्याने दिव्यांग मतदारांना मतदान करता आले नाही. फोटो ओळखपत्राअभावीही अनेक मतदारांना मतदान करता आले नाही. 11 वाजेर्पयत 23.44 टक्के मतदान झाले असले तरी अनेक मतदान केंदवर मतदारच नसल्याने मतदान अधिकारी बसुन होते. दुपारी एक वाजेपर्यंत 38.42 टक्के मतदान झाले.
नगरपालिका शाळा क्र 16 मधील मतदान केंद्र क्रमांक 189 वरील व्हीव्हीपॅट मशिन बंद पडल्याने मतदान थांबले. अध्र्या तासाने व्हीव्हीपॅट मशिन बदलून मतदान सुरु करण्यात आले.
शारदा कन्या विद्यालयात मतदान केंद्र क्रमांक 2/176 हे सखी मतदान केंद्र होत़े याठिकाणी केंद्राध्यक्ष ते शिपाई असे सर्वच महिला होत्या़ केंद्रावरील सर्व महिलांनी पहिल्यांदा निवडणूक कर्तव्य बजावल़े प्रा. मृणाल जोगी ह्या केंद्राध्यक्ष होत्या तर टी.बी.शिदे, सुलक्षणा पटेल, वळसा पाटील, दिपाली दाभाडे, शितल बारी यांनी मतदान अधिकारी म्हणुन केंद्र सांभाळले. या मतदान केंद्रावर दुपारी दोनर्पयत 38 टक्के मतदान झाल़े
वसंतराव नाईक विद्यालयातील केंद्र क्रमांक 2/180 आदर्श मतदान केंद्र होते. सकाळी मतदान सुरु झाल्यापासुन सायंकाळर्पयत येथे मतदान सुरुच होत़े दुपारी दोनर्पयत येथे 54 टक्के मतदान झाले होत़े आदर्श व सखी मतदान केंद्रांवरुन वेबकास्टींग करण्यात आल़े
नंदुरबार
नंदुरबार विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 361 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती़ यात नंदुरबार शहरात 102 मतदान केंद्रांवर सकाळपासून गर्दी झाल्याचे दिसून आल़े शहरालगतच्या होळ तर्फे हवेली, वाघोदा, दुधाळे येथील मतदान केंद्रांसह तालुक्यातील धानोरा, नटावद, कोठली, पिंपळोद, लहान शहादे, शिंदे, कोळदे, पातोंडा, काकर्दे, कलमाडी, दहिंदुले येथील मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आल़े
अक्कलकुव्यात संथ गतीने सुरुवात
अक्कलकुवा मतदारसंघात काही मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यान काही ठिकाणी संथ गतीने मतदान सुरु होत़े काही केंद्रांवर सकाळी 11 वाजेर्पयत मतदान टक्केवारी 40 टक्क्यांच्या पुढे गेली होती़ दुपारी 1 वाजेर्पयत मतदारसंघात 38.32 टक्के तर दुपारी 3 वाजेर्पयत 52़56 टक्के मतदान झाले होत़े सायंकाळी उशिरार्पयत मतदान केंद्रांवर मतदारांची उपस्थिती असल्याने चिठ्ठय़ा वाटप करुन केंद्र सील करुन मतदान सुरु ठेवण्यात आले होत़े यामुळे उशिरार्पयत आकडेवारी मिळू शकलेली नव्हती़ मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी व्हीलचेअर देण्यात आल्या होत्या़ ज्येष्ठ नागरीक, महिला, तरुण यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मतदान केल़े मतदार संघातील बहुतांश मतदान केंद्रे ही दुर्गम भागात असल्याने उशिरार्पयत इव्हीएम घेऊन कर्मचारीत परतत होत़े
गोदीपूर ते चांदसैली या गावादरम्यान वाहणारी सुसरी नदी अद्यापही दुथडी भरुन वाहत असल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटलेला आह़े गोदीपूर येथे जाण्यासाठी चांदसैली आणि नवेगोदीपूर येथील मतदारांना ब्राrाणपुरी मार्गाने पायपीट करत जावे लागल़े चांदसैली येथील महिला व पुरुष हे सकाळी 10 वाजेपासून पायीच गोदीपूरकडे जात असल्याचे दिसून येत होत़े