जातीवादी विचारांच्या सरकारला हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:32 AM2018-03-12T11:32:58+5:302018-03-12T11:32:58+5:30

पीपल्स रिपब्लीकन पार्टी : शहादा येथील जाहीर सभेत जोगेंद्र कवाडेंचा इशारा

Execution of the casteist thinking government | जातीवादी विचारांच्या सरकारला हद्दपार करा

जातीवादी विचारांच्या सरकारला हद्दपार करा

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 12 : देशात भाजपाचे अर्थात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्या दिवसापासून 130 कोटी जनतेचा उन्हाळा तेव्हापासून सुरु झाला आहे. शेतक:यांचे, गरीबांचे वाटोळे करणारे, जातीवादी शक्ती निर्माण करणा:या संघ विचाराच्या सरकारला हद्दपार करण्यासाठी बहुजन समाजाने एकत्रित येणे गरजेचे आहे, असे आवाहन पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांनी केले. 
पीपल्स रिपब्लीकन पार्टी पक्षाच्या कार्यकत्र्याचा मेळावा व जाहीर सभा शहरातील जनता चौकात रविवारी आयोजित करण्यात आली होती. त्यात आमदार कवाडे बोलत होते. या वेळी प्रदेश अध्यक्ष गोपाळराव आथोते, पक्षाचे गुजरात प्रमुख सुरेश सोनवणे, प्रदेश महामंत्री जगन सोनवणे, मराठवाडा विभाग प्रमुख अनिल कुरुकमारे, भगवान आढाव, पुरुषोत्तम गरुड, शशिकांत उनवणे, सचिन उनवाने, बाबू ढवळे, परशू करनकाळ, नगरसेविका पुष्पा सोनवणे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विक्की मोरे आदी उपस्थित होते. 
या वेळी जोगेंद्र कवाडे म्हणाले की, बाबासाहेबांच्या देशात शेतक:यांना कर्जामुळे आत्महत्या करावी लागते हे मोठे दुर्दैव आहे. आदिवासी दलित बहुजनांवर अत्याचार सुरु आहेत. देशात भगव्यांचे व ब्राrाणवाद्यांचे सरकार आहे. ज्यांनी जागतिक क्रांती केली अशा क्रांतीकारकांचे, राष्ट्रपुरुषांचे पुतळे उखडून टाकले. देश कोणत्या पातळीवर चाललेला आहे याचा विचार करण्याची गरज आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वाना सोबत घेऊन न्याय दिला होता. मराठी राज्याची स्थापना केली होती तेव्हा संभाजी भिडे, मोहन भागवत होते का? आता आयत्या पिठावर रेघोटय़ा ओढणारे नेते जन्माला आले आहेत. भाजपा व संघ विचारसरणीच्या नेत्यांनी दफण झालेली ब्राrाणवादी भुते बाहेर काढली हे बहुजन समाजाने ओळखण्याची गरज आहे. गोविंद गायकवाड यांची भिमाकोरेगाव येथील समाधी उद्ध्वस्त करुन सरकार पुरस्कृत आतंकवाद चालवलेला आहे. या देशातील अंबानी-अदाणीला न्याय मिळतो मात्र शेतक:याला कर्जमाफीसाठी न्याय मिळत नाही. निरव, ललीत मोदी, विजय माल्या देशातील पैसा घेऊन पळून गेले  त्यांना सरकार आणू शकत नाही          परंतु शेतक:यांची संपती जप्त केली जाते. नरेंद्र मोदी हे देशाचे की जगाचे पंतप्रधान आहेत हे कळत  नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
जगन सोनवणे म्हणाले की, आम्ही जातीवादी शक्तीला थारा देत नाही, देशात दंगली घडविणा:यांना साथ दिली जाणार नाही. हिंदुत्व व ब्राrाणीकरण करण्याचे षड्यंत्र राज्यकत्र्यानी चालविलेले आहे. कार्यकत्र्यावर पडद्यामागचे नेते खोटे गुन्हा दाखल करण्याचे काम करीत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल, असे सांगितले.
अनिल कुरुकमारे, भगवान आढाव, पुरुषोत्तम गरुड, सचिन उणवणे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विक्की मोरे यांनी केले. सभेसाठी जितेंद्र शिरसाठ, इमरान पठाण, कमलेश मोरे, लकी मोरे, इकबाल शेख, बाबू ढवळे  यांच्यासह कार्यकत्र्यानी परिश्रम घेतले.
 

Web Title: Execution of the casteist thinking government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.