पटसंख्या वाढविण्यासाठी कसरत : नंदुरबार पालिका शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:15 PM2018-07-26T12:15:48+5:302018-07-26T12:15:55+5:30
नंदुरबार : नंदुरबारातील नगरपालिका शाळांची घसरत चाललेली पटसंख्या सध्या चिंतेचा विषय ठरत आह़े नंदुरबार नगरापालिकेच्या 16 शाळांमध्ये 1 हजार 35 विद्यार्थी प्रवेशित असून मागील वर्षी विद्याथ्र्याची संख्या 1 हजार 184 इतकी होती़ त्यामुळे वर्षागणिक विद्याथ्र्याच्या पटसंख्येत घट होत असल्याने ही चिंतेची बाब ठरत आह़े
विद्याथ्र्याचा खाजगी व इंग्रजी माध्यमातील शाळांकडे वाढता कल, शिक्षण क्षेत्रात वेगाने होत असलेले बदल यामुळे नगरपालिका तसेच जिल्हा परिषद शाळांना घरघर लागली आह़े त्यामुळे पटसंख्या वाढविण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर कायम आह़े नगरपालिकेच्या काही शाळांमध्ये पटसंख्या ब:यापैकी असली तरी, ती केवळ कागदावरच दाखविण्यात येत आह़े प्रत्येक्षात विद्यार्थी शाळेत येत आहेत की नाही याबाबत खातरजमा करण्यासाठी शिक्षण विभागाकडे कुठलीही सक्षम यंत्रणा नाही़
नंदुरबार नगरपालिकेच्या 16 पैकी, दोन शाळा वगळल्यास एकाचीही पटसंख्या शंभरावर नाही़ तर, 7 शाळांच्या पटसंख्येने पन्नाशी पार केली आह़े
शाळानिहाय विद्याथ्र्याची पटसंख्या पुढील प्रमाणे शाळा क्ऱ 1 - 94, शाळा क्ऱ 2 - 34, शाळा क्ऱ3 (गुजराती) - 53, शाळा क्ऱ 4 - 80, शाळा क्ऱ 5 (उर्दू) - 29, शाळा क्ऱ 7 - 41, शाळा क्र 8 - 50, शाळा क्र 10 - 55, शाळा क्ऱ 11 (उर्दू) - 107, शाळा क्र 12 - 72, शाळा क्र 14 (उर्दू) - 28, शाळा क्ऱ 15 - 73, शाळा क्ऱ 17 (उर्दू) - 205, शाळा क्ऱ 19 - 24 , शाळा क्ऱ 20 (उर्दू) - 43, शाळा क्ऱ21 (उर्दू) - 47 अशा प्रकारे एकूण 16 शाळांमध्ये 1 हजार 35 विद्यार्थी पटसंख्येवर दाखविण्यात आलेले आहेत़
स्थलांतरित विद्यार्थी जास्त
बहुतेक सधन घरातील विद्यार्थी खाजगी शाळांकडे वळत असतात़ त्यामुळे नगरपालिका शाळांमध्ये आर्थिक दृष्टय़ा मागासलेल्या विद्याथ्र्याचीच संख्या अधिक असत़े त्यातच यामध्ये स्थलांतरित विद्याथ्र्याची संख्या अधिक आह़े विविध रोजगारांसाठी कायम स्थलांतर करणा:या मजुरांच्या पाल्यांसाठी शिक्षण घेण्याचा पर्याय म्हणून नगरपालिकांच्या शाळांकडे पाहिले जात आह़े संबंधित स्थलांतरित विद्याथ्र्याकडे शैक्षणिक हमी कार्ड असल्यास त्याला केव्हाही नगरपालिका शाळांमध्ये प्रवेश घेण्याची मुभा मिळालेली आह़े
शाळा बाह्य विद्याथ्र्याचा शोध
नगरपालिका शिक्षण विभागाकडून मार्च एप्रिल दरम्यान, शहरातील शाळा बाह्य विद्याथ्र्याचा तसेच स्थलांतरित विद्याथ्र्याचा शोध घेण्यात येत असतो़ सततची घटत चाललेली पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांना मोठय़ा प्रमाणावर आटापिटा करावा लागत आह़े विशेष करुन पटसंख्या कमी झाल्यास शिक्षक अतिरिक्त ठरण्याचाही धोका संभवतो़ त्यामुळे पटसंख्येअभावी शाळा बंद होण्याची वेळ येऊ नये यासाठी शिक्षकांकडून विद्यार्थी शोध मोहीम राबविण्यात येत असत़े 30 सप्टेंबर्पयत प्रवेशित विद्याथ्र्याची पटसंख्या बघूनच शिक्षकांची निश्चिती प्रशासनाकडून करण्यात येत असत़े त्यानुसार किती शिक्षक अतिरिक्त ठरतात याचीही संख्या समजत असत़े
विद्यार्थी पटसंख्या नावालाच
प्रत्येक्ष शाळेच्या पटावर विद्याथ्र्याची पटसंख्या दाखविण्यात येत असली तरी, प्रत्यक्षात शाळेत किती विद्यार्थी येतात? हे बघणे महत्त्वाचे ठरत आह़े बहुतेक विद्याथ्र्याकडून शाळेत केवळ प्रवेश घेण्यात येत असल्याचे चित्र अनेक नगरपालिका शाळांमध्ये दिसून येत आह़े नगपालिकेच्या 16 शाळांपैकी 9 शाळा पहिली ते सातवीर्पयत आहेत, तर उर्वरित 7 शाळा पहिली ते चौथी र्पयत आह़े विद्यार्थी शाळेत येत नसल्याने साहजिकच याचा संबंधित शाळेच्या गुणवत्तेवरही परिणाम होणे नाकारता येत नाही़ विद्याथ्र्यानी काळजीने शाळेत यावे यासाठी शिक्षण विभागाकडून व्यापक प्रमाणावर प्रयत्न होणे गरजेचे आह़े त्याशिवाय विद्यार्थी तसेच पालकांर्पयत जाऊन शाळेचे महत्त्व पटवून देणे महत्वाचे आह़े त्या शिवाय शाळेची पटसंख्या वाढणे निव्वळ अशक्य असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आह़े
दरम्यान, सर्वाधिक कमी पटसंख्या उदरु शाळा क्ऱ 19 मध्ये सर्वात कमी म्हणजे 24 इतकीच पटसंख्या आह़े त्यामुळे बहुतेक शाळांमध्ये पटसंख्येत वेगाने घट होत असल्याने या शाळा बंद होतात की काय अशी भीती व्यक्त होतेय़