नाट्यचळवळीला गती देण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 12:53 PM2020-01-06T12:53:37+5:302020-01-06T12:53:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात दहा वर्षापासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा घेण्यात येत आहे. यंदाच्या स्पर्धेला नाट्यरसिकांचा चांगला प्रतिसाद ...

Expect to speed up the theater | नाट्यचळवळीला गती देण्याची अपेक्षा

नाट्यचळवळीला गती देण्याची अपेक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात दहा वर्षापासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा घेण्यात येत आहे. यंदाच्या स्पर्धेला नाट्यरसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला, त्यामुळे नाट्य चळवळीशी जिल्ह्यातील रसिक जुळले गेले आहे. या रसिकांच्या माध्यमातून चळवळीला गती देण्याची अपेक्षा एकांकिकांमधील कलावंत व उपस्थित नाट्यकर्मींनी व्यक्त केली.
गाडगे बाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे नंदुरबारात ३ ते ५ जानेवारी या कालावधीत राज्य पुरस्कृत शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर उर्फ जिभाऊ यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा घेण्यात आल्या. यासाठी महाराष्टÑातून मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमळनेर, जळगांव, भुसावळ, धुळे, चोपडा, एरंडोल, उल्हासनगर येथील नाट्यसंस्था शिवाय इंदौरहुनही सहभागी झाले असून २१ एकांकीकांचा समावेश होता. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नऊ, दुसऱ्या दिवशी १० तर अखेरच्या दिवशी दोन नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. शेवटच्या दिवशीच अन्य कार्यक्रमही झाले त्यात परिक्षकांचा परिसंवाद व मुंबई येथील हास्यकलाकार विलासकुमार शिरसाठ यांचा बहारदार कार्यक्रमही घेण्यात आला. परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक दिनानाथ मनोहर, सिने दिग्दर्शक शाम रंजनकर, नाट्य अभिनेता आत्माराम बनसोडे, अभिनेता डॉ.मंगेश बनसोडे, विरा साथीदार, नाटककार अजित भगत, कुंदा निळकंठ, रवींद्र लाखे, नाट्य लेखक दत्ता पाटील यांनी सहभाग घेतला. याच कार्यक्रमात शहादा येथील रंगश्री ग्रुपचे नाट्यकर्मी डॉ.शशांक कुलकर्णी यांचा दीपस्तंभ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यांच्यासोबत डॉ.अलका कुलकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला. डॉक्टरांकडून निर्मित लघुपट देखील सादर करण्यात आला.
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नागसेन पेंढारकर यांच्या नेतृत्वाखाली मनोज पटेल, मनोज सोनार, राजेश जाधव यांच्यासह समितीतील अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले.
७२ चे गणित
भुसावळ येथील नाहटा महाविद्यालयाच्या कलापथकामार्फत ‘७२ चे गणित’ ही एकांकिका सादर करण्यात आली. यात मानवी शरीर व्यवस्थेची मांडणी करण्यात आली आहे. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पेशींचा मोठा वाटा आहे. परंतु या पेशी व्यसनांमुळे कमी होऊन मानवी शरीरच धोक्यात येत आहे. नष्ट होणाºया पेशीची व्यथा या एकांकिकेत मांडण्यात आली असून एकंदरित यातून व्यसनपासून दूर राहरण्याचा संदेश देण्यात आला आहे.
भभूत्या
जळगाव येथील भाग्यदीप थिएटर्स जळगाव यांच्यामार्फत भभूत्या ही एकांकिा साद करण्यात आली. हे नाटक प्रामुख्याने अंधश्रद्धेवर भाष्य करणारे होते. भभूत्या हे एका गावाचे देवस्थान असून त्याची सेवा आप्पा व त्याचे कुंटुंबिय करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. जंगल नष्ट होत असून जळीबुटीचेही प्रमाण कमी झाले, ही बाब आप्पा त्या ग्रामस्थांना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. काही कालावधीनंतर आप्पाचे घर जाळले जाते, त्यात आप्पाचा मुलगा व पत्नी दगावले. यावरुन अताच्या युगात लोकांना चांगले चांगायचेही गुन्हा ठरत असल्याचे दाखविण्यात आले आहे.
शेवट इतका गंभी नाही
इंदौर येथील रंगायन नाट्यसंस्थेमार्फत ‘शेवट इतका गंभीर नाही’ ही एकांकिका सादर करण्यात आली. त्यात प्रामुख्याने तंत्रज्ञानाचा वाढता वापर व ग्रामीण जीवन दाखविण्यात आले आहे. शेतात मोबाईलचा टॉवर लावण्यासाठी कंपनीने शेतकºयाला कोठी रक्कम देण्याचे कबुल केले. परंतु ती रक्कमच मिळाली नसल्याने जॉब विचारला कंपनीकडे जातो, परंतु तेथे त्याला नैराश्य येते त्यातूनच तो आत्महत्या करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. यातून तंत्रज्ञान हे भावपिनक विचार करीत नाही हे दाखविले.
गुलाबची मस्तानी
उल्हासनगर येथील रंगमंचमार्फत एकांकिका स्पर्धेच्या दुसºया दिवशी गुलाबची मस्तानी हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकातही समाजाच्या एका वास्तव घटकावर भाष्य करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगातील सर्वच भूमिका लक्षवेधी ठरल्या. यांच्यासह अन्य नाट्यप्रयोगातील विषय देखील सामाजिक समस्यांवर सादर करण्यात आले. त्यात अरण्य, गुलाबाची मस्तानी, नेकी, शेवट तिकका गंभीर नाही यांच्यासह अन्य सर्वच नाटकांचा समावेश करण्यात येत आहे.

४नंदुरबारात तीन दिवसांपासून एकांकिका स्पर्धा घेण्यात येत होती. पहिल्या व दुसºया दिवशी उपस्थित झालेल्या नाट्यरसिकांच्या तुलनेत अखेरच्या दिवशी सर्वाधिक रसिकांनी उपस्थिती नोंदवली. त्यात बहुसंख्य रसिकांनी सहपरिवार उपस्थिती नोंदवली. त्यामुळे एकांकिका सादर करणाºया कलावंतांमध्ये देखील प्रयोग सादरीकरणात उत्साह दिला.
४नंदुरबार शहरातील काही शाळांमार्फत देखील विद्यार्थ्यांना या नाटक पाहण्यासाठी आणण्यात आले होते. त्यात श्रॉफ हायस्कुलच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. समाजाच्या वास्तव समस्यांवर एकांकिका सादर करण्यात आल्यामुळे या विद्यार्थ्यांना निश्चितच सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणा मिळाली असावी, असे म्हटले जात आहे.

Web Title: Expect to speed up the theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.