सकाळच्या प्रहरी उन्हात बसणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 12:27 PM2020-12-24T12:27:35+5:302020-12-24T12:27:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  सकाळच्या सुमारास गल्लीमध्ये उन्हात बसलेल्या दोन महिलांना कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ...

Expensive to sit in the morning sun | सकाळच्या प्रहरी उन्हात बसणे पडले महागात

सकाळच्या प्रहरी उन्हात बसणे पडले महागात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा :  सकाळच्या सुमारास गल्लीमध्ये उन्हात बसलेल्या दोन महिलांना कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ५० वर्षीय महिलेच्या मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली.तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली असून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास तळोदा शहरातील खान्देशी गल्लीमध्ये राहणाऱ्या विजयाबाई भगवान कलाल (वय ५२ ),रेहनाबी शेख या दोघी अंगणात सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्या  होत्या.त्यावेळी त्यांना लाल रंगाची चारचाकी भरधाव कारने ( क्रमांक एम एच ३९ जे ६४१६) जोरदार ठोस दिली.या अपघातात विजयाबाई कलाल व रेहनाबी शेख यांना गंभीर दुखापत झाली.त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली. त्याठिकाणी विजयाबाई कलाल यांना मृत घोषित करण्यात आले तर रेहनाबी शेख यांनी पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात    आले.
या अपघात प्रकरणी संबधीत चालक विरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  रुबिनाबी शेख रियाद यांच्या फिर्यादीवरून आरोपी तिरथ उमाकांत शेंडे रा.खान्देश गल्ली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे हे करीत आहे.
दरम्यान शहरातील गजबजलेल्या रहिवासी परिसरात अशाप्रकारे अपघातात विज्याबाई कलाल यांचा अकस्मात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दुर्देवी मृत्यूमुळे खान्देशी गल्लीत हळहळ
 सद्या थंडीचे प्रमाण जास्त आहे. सकाळी १० वाजेपर्यंत गारठा असतो. त्यामुळे सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेण्यासाठी नेहमीप्रमाणे खान्देशी गल्लीतील या महिला देखील बसल्या होत्या.  
आपल्या गप्पांमध्ये मग्न असतांना अचानक आलेल्या कारने या महिलांना उडवले. काही कळण्याच्या आतच हा सर्व प्रकार घडल्याने मदतीसाठी देखील अनेकजण धावले. परंतु विजयाबाई कलाल यांना जबर मार लागल्याने त्यांचा त्यात मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. 

Web Title: Expensive to sit in the morning sun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.