विसरवाडी येथे पुतण्यानेच काकांचा खून केल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:01 PM2018-03-01T12:01:48+5:302018-03-01T12:01:48+5:30

शेतीचा वादाचे कारण : चार दिवसात लावला खुनाचा तपास

Explain the murder of uncle by forgiveness in forgiveness | विसरवाडी येथे पुतण्यानेच काकांचा खून केल्याचे उघड

विसरवाडी येथे पुतण्यानेच काकांचा खून केल्याचे उघड

Next

लोकमत ऑनलाईन
विसरवाडी, दि़ 1 : शेती नावावर करून देत नाही म्हणून पुतण्यानेच काकांचा खून केल्याची घटना उघड झाली आहे. 24 फेब्रुवारी रोजी खातगाव शिवारातील जंगलात घडली होती. याबाबत विसरवाडी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कुश जयसिंग वळवी, रा.खातगाव, ता.नवापूर असे संशयीत आरोपीचे नाव आहे. 24 फेब्रुवारी रोजी भिमसिंग राघु वळवी, रा.खातगाव यांचा मृतदेह खातगाव शिवारातील जंगलात आढळून आला होता. भिमसिंग हा शेतात झोपलेला होता. त्याच्या छातीवर दगडाने घाव घालून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी  मृतदेह त्यांच्यातच शेतातील    विहिरीत टाकण्यात आला होता. 25 रोजी ही घटना उघडकीस आली   होती. 
याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर गुप्त माहितीच्या आधारे चुलत पुतण्या कुश जयसिंग वळवी यानेच भिमसिंग वळवी यांचा खून केल्याचे समोर आले. शेती नावावर करून देत नाही म्हणून काकांवर कुश याचा राग होता. त्यातूनच हा खून झाल्याचे समोर आले आहे. 
पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे, डीवायएसपी रमेश पवार, एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक धनंजय पाटील, हवालदार प्रताप वसावे, तुषार सोनवणे, विनायक सोनवणे, तुषार पाडवी, भगवान गुट्टे, अतुल पानपाटील, संजय साळवे यांनी ही कारवाई केली.
 

Web Title: Explain the murder of uncle by forgiveness in forgiveness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.