खांबात वीज प्रवाह उतरल्याने रायखेड येथे म्हैस ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:32 PM2019-07-09T12:32:13+5:302019-07-09T12:32:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील रायखेड येथील ग्रामपंचायतीच्या आवारात विजेचा प्रवाह उतरलेल्या खांबाला स्पर्श झाल्याने म्हैस ठार ...

The explosion took place at Raikhhed after the lightning flown at Khamba | खांबात वीज प्रवाह उतरल्याने रायखेड येथे म्हैस ठार

खांबात वीज प्रवाह उतरल्याने रायखेड येथे म्हैस ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील रायखेड येथील ग्रामपंचायतीच्या आवारात विजेचा प्रवाह उतरलेल्या खांबाला स्पर्श झाल्याने म्हैस ठार झाल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की, भगवान मेला भरवाड हे नेहमीप्रमाणे म्हशी चारून घराकडे येत होते. ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील हौदात पाणी पाजून जवळच असलेल्या हायमास्ट लॅम्पच्या खांबात वीज प्रवाह उतरला होता. या खांबाला म्हशीचा स्पर्श झाल्याने ती जागीच ठार झाली.  रायखेडसह परिसरात पाऊस चांगला पडत असल्याने खांबामध्ये वीज प्रवाह उतरल्यामुळे म्हशीला जीव गमवाला लागला. या परिसरात लहान मुले व ग्रामस्थांचा नेहमी वावर असतो. जर नजरचुकीने या खांबाला स्पर्श झाला तर मोठी दुर्दैवी घटना घडू शकते. रायखेड येथील लाईनमन उमेश यांनी घटनास्थळी धाव घेत वीज खांबात उतरलेला वीज प्रवाह बंद केला. 
दरम्यान, भगवान भरवाड यांचा दुग्ध व्यवसाय असून ठार झालेल्या म्हशीची किंमत 70 ते 80 हजारार्पयत होती. वीज प्रवाह उतरलेल्या खांबाला स्पर्श झाल्याने म्हैस ठार झाल्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
 

Web Title: The explosion took place at Raikhhed after the lightning flown at Khamba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.