तळोद्यात नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:34 AM2021-09-23T04:34:04+5:302021-09-23T04:34:04+5:30
प्रस्तावना सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनवणे यांनी केली. यावेळेस प्रतिष्ठानकडून आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा ...
प्रस्तावना सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनवणे यांनी केली. यावेळेस प्रतिष्ठानकडून आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे म्हणाले की, सेवाभावेने अतिदुर्गम भागात शिबिर घेऊन गोरगरिबांची तपासणी केली. फार चांगले काम केले व त्यांनी अशीच सेवा कायम द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राध्यापक राजाराम राणे म्हणाले की, विजयराव सोनवणे दरवर्षी असे चांगले लोकउपक्रम घेत असतात, त्यातील एका उपक्रमाचा लाभ सर्व गावातील-पाड्यातील माता-बंधूंनी घ्यावा, असे आवाहन केले.
सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक संतोष जगत चौधरी, नकुल दिल्या ठाकरे, सुनील मदन मोरे, चुंबलाल ठाकरे, सुरपसिंग काला ठाकरे, कृष्णा सायसिंग ठाकरे, सांगदेव हरिसिंग वळवी, किशोर राजा पाडवी, शांतीराम रामजी वळवी, राजेश गोरख मोरे, राजकुमार सुरसिंग ठाकरे, सोन्या पाडवी, गबा विठ्ठल राहासे यांनी मेहनत घेतली. आभार संस्थेचे संचालक नकुल दिल्या ठाकरे यांनी मानले.