डोळ्या देखत होत्याचे नव्हते झाले, संसार कोलमडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:25 PM2017-11-01T13:25:35+5:302017-11-01T13:25:35+5:30
वसावे कुटुंबियांची व्यथा : मालखुर्द दुर्घटनेत संसार पडला उघडय़ावर
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : गेल्या चार पिढय़ांपासून अपार मेहनतीने गोळा केलेले 90 क्विंटल भगर (धान्य) त्याच बरोबर किमती जनवरे आगीत भस्म झाल्याने मालखुर्द येथील वसावे कुटुंब रस्त्यावर आले आहे.
त्यामुळे साहजिकच या कुटुंबास शासनाच्या तरतुदीच्या आधाराची गरज आहे. तळोदा तालुक्यातील सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील मालखुर्द हा छोटासा 50 ते 60 वस्त्यांचा पाडा होता़ येथे वसावे कुटुंबिय सूखी संसार करीत होत़े मोठय़ा मेहनतीने, अपार कष्ट करत या कुटुंबाने थोडीफार संपत्ती जमविली होती. उंच टेकडय़ांवर शेती कसरत करीत होत़े जवळ पास आजोबा, पंजोबा अशा चौथ्या पिढीपासून त्यांनी भगर धान्य साठवलेल होत. नैसर्गिक आपतीत ते हे धान राखून ठेवत असत. साहजिकच या कुटुंबच्या संसार सुखात सुरु होता़ मात्र, शनिवारी मध्यरात्री लागलेल्या अगिAतांडवात या कुटुंबियांचा संपूर्ण संसार उघडय़ावर पडला आह़े यात, त्याची किमती 35 जनावरे होरपळून मृत्यूमुखी पडली आहेत़ त्यामुळे पाहता पाहता होत्याचे नव्हते झाले. हे कुटुंब बेघर होवून रस्त्यावर आले आहे. अचानक ओढावलेल्या या संकटामुळे वसावे कुटुंबिय चिंताग्रस्त झाले आह़े त्यांना आता आधाराची गरज असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आहे.