जिल्हा न्यायालयात ई-सुविधा केंद्राची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 11:56 AM2020-11-25T11:56:42+5:302020-11-25T11:56:49+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्हा न्यायालयात ई-सुविधा केंद्र कार्यान्वीत झाल्याने पक्षकार, वकिल यांना मोठी सोय झाली आहे. या ...

Facility of e-Suvidha Kendra in District Court | जिल्हा न्यायालयात ई-सुविधा केंद्राची सोय

जिल्हा न्यायालयात ई-सुविधा केंद्राची सोय

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  जिल्हा न्यायालयात ई-सुविधा केंद्र कार्यान्वीत झाल्याने पक्षकार, वकिल यांना मोठी सोय झाली आहे. या केंद्रातून विविध बाबी सहजरित्या उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. 
नंदुरबार येथील जिल्हा न्यायालयात ई-सुविधा केंद्राचे उदघाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्या.प्रमोद तरारे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्य‍क्रमास मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.जी.चव्हाण,जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव एस.टी.मलिये,प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.बी.पाटील,जिल्हा बार असोसिएशनचे अध्युक्ष अ‍ॅड.के.एच.सावळे,जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.एस.पी.पंडीत अदि उपस्थित होते. 
सदर ई-सेवा केंद्रामध्ये विधीज्ञ,व पक्षकार यांचे सोयीसाठी विविध    सुविधा उपलब्धव करुन देण्यांत आलेल्या आहेत.त्यांत प्रामुख्यांने न्यायालयीन प्रकरणांची स्थिती,नकलेचे ऑनलाईन अर्ज, ई-फायलिंग सुविधा, ई-पेंमेट, डिजीटल स्वाक्षरी,   ई-कोर्टाचे मोबाईल अ‍ॅप,न्यांयालयीन प्रकरणांचा निकाल ऑनलाईन प्राप्त करणे, तसेच ई-कोर्ट प्रोजेक्ट् अंतर्गत येणा-या सर्व प्रकरणांचे व समस्याांचे निराकरण  करणे इत्याादी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
यामुळे पक्षकार, वकिल यांना सोयीचे होणार आहे. अनेक दिवसांपासून या केंद्राबाबत पाठपुरावा सुरू होता. 

Web Title: Facility of e-Suvidha Kendra in District Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.