वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांच्या आलेखात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 11:34 AM2019-01-12T11:34:29+5:302019-01-12T11:34:37+5:30
सुरक्षितता सप्ताह : एसटी चालक-वाहकांना दिली शपथ
नंदुरबार : महाराष्ट्रात गेल्या वर्षी 14 हजार व्यक्तींचा रस्ते अपघातात मृत्यू झाला़ अपघातात मृत्यू होणा:यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो़ त्यामुळे सर्वानी काटेकोरपणे वाहतूक नियम पाळल्यास हा आलेख कमी करता येऊ शकतो असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव यांनी केल़े
नंदुरबार येथील बसस्थानकात सुरक्षित मोहिम पंधरवडय़ाचे आयोजन करण्यात आले होत़े या वेळी ते बोलत होत़े या वेळी विभागीय भांडार अधिकारी एल़बी़ लहानगे, आगारप्रमुख नीलेश गावीत, एटीएस आऱ एस़ जगताप, एडब्लूएस वाय़एस़ शिवदे, कामगार संघटनेचे अध्यख फिरोज मन्सूरी होत़े
दरवर्षी रस्ते अपघातात हजारो व्यक्तींचा बळी पडत असतात़ सध्या मोठय़ा प्रमाणात बेशिस्त वाहतुक सुरु असल्याने एसटी महामंडळाकडून विविध आगारात सुरक्षा मोहिम पंधरवडय़ाचे उद्घाटन करुन याबाबत जनजागृती करण्यात येत आह़े यांतर्गत चालक वाहकांना सुरक्षित वाहतुकीबाबत मार्गदर्शन करण्यात येत असत़े तसेच वाहतूक नियमांचे बारकावे सांगण्यात येत असतात़
अक्कलकुवा आगार
अक्कलकुवा आगारातही सुरक्षित सप्ताहांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला़ या वेळी आगारप्रमुख अनुजा दुसाने उपस्थित होत्या़ आगारातील कर्मचा:यांना सुरक्षित वाहतुकीची शपथ देण्यात आली़ तसेच वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आल़े या वेळी मोठय़ा संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत़े
शहादा येथील बसआगारात सुरक्षित मोहिमेचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या हस्ते करण्यात आल़े यावेळी प्रा़ दत्ता वाघ, प्रा़ रविंद्र पंडय़ा, वाहतूक अधिक्षक ए़टी़ मगरे, सहायक कार्यशाळा अधीक्षक अमृतकर, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी एऩडी़ चित्ते, लेखाकार गौतम पावरा आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राध्यापक दत्ता वाघ यांनी सांगितले की, चालकांच्या हाती प्रवाशांचे भवितव्य अवलंबून असत़े अपघात चालकाच्या चुकीमुळे होतो, असे नव्हे त्यात अनेक कारणेदेखील आहेत़ अपघात होऊ नये यासाठी वाहतूक नियम व सकारात्मक विचारांची आवश्यकता आह़े चालकाने नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली़ वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शनही करण्यात आल़े
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विलास पाटील यांनी केल़े कार्यक्रम यशस्वीतेसाठी आऱ क़े कुवर, एस़ बी़ सपे, एल़ बी़ कोळी यांनी परिश्रम घेतल़े