सरदार सरोवर बाधित कुटूंब : 52 कुटूंबांसाठी नवीन वसाहत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:37 PM2018-01-14T12:37:39+5:302018-01-14T12:37:44+5:30

Families affected by Sardar Sarovar: 52 new colonies for families | सरदार सरोवर बाधित कुटूंब : 52 कुटूंबांसाठी नवीन वसाहत होणार

सरदार सरोवर बाधित कुटूंब : 52 कुटूंबांसाठी नवीन वसाहत होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : सरदार सरोवर बाधितांसाठी आता अकरावी पुनर्वसन वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. 52 कुटूंबांसाठी न्यूबन गावठाणात ही वसाहत राहणार असून तेथे घरांच्या बांधकामाचे शनिवारी भुमिपूजन करण्यात आले. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या कुटूंबांना न्याय मिळणार आहे.
गेल्या दहा वर्षापासून सरदार सरोवर प्रकल्पात बाधित होऊन घरांपासून वंचीत असलेल्या 52 कुटूंबांचे पुनर्वसन तालुक्यातील न्यूबन गावाजवळील गावठाणात करण्यात येणार आहे. या कामाचे भुमिपूजन शनिवारी एका कार्यक्रमात करण्यात आले. हक्काच घर आणि गाव मिळणार असल्याने प्रकल्प बाधितांच्या चेह:यावर समाधान दिसून येत होते. आता प्रशासनाने युद्धपातळीवर कामे पुर्ण करून एक आदर्श वसाहत निर्माण करण्याची अपेक्षाही प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे.
सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील भुषा, वडद्या, हुंडारोषमाळ, भरड, शेलगदा, उनवणे व साव:यादिगर अशा सात गावांमधील साधारण 52 कुटूंबांचे 2008 मध्ये पुनर्वसन करण्यात आले होते. तथापी त्यांना वसाहतींमध्ये घरे मिळालेली नव्हती. त्यामुळे हे सर्व बाधित आपल्या स्वत:च्या शेतात राहत होती. घरे नसल्यामुळे त्यांना शासनाच्या विविध शासकीय योजनांबरोबरच पायाभूत सुविधांपासून वंचीत राहावे लागत होते. घरांसाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर प्रशासनाने देखील याप्रकरणी ठोस कार्यवाही करून बाधितांसाठी जागा उपलब्ध करून दिली. 
तालुक्यातील न्यूबन गावाजवळील तीन हेक्टर 12 आर जागा निश्चित करण्यात आली. या घरांच्या बांधकामाचे भुमिपूजन शनिवारी पंचायत समितीच्या सभापती शांतीबाई दिवाकर पवार, उपसभापती दिपक मोरे, तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.कांतिलाल टाटीया, न्यूबनचे सरपंच सुरेश ठाकरे, धनपूरचे सरपंच अनिल वळवी, दिवाकर पवार, रेवनानगरचे दाज्या पावरा, उपअभियंता आर.ओ.पाटील, खंदारे आदी उपस्थित होते. यावेळी बाधितांना मार्गदर्शन करतांना तहसीलदार चंद्रे म्हणाले, वसाहतीचे काम युद्धपातळीवर पुर्ण करून आवश्यक त्या सुविधांसह दोन महिन्यात वसाहत हस्तांतर करण्यात येईल. एक आदर्श वसाहत निर्माण व्हावी यासाठी प्रकल्पग्रस्तांनी देखील सहकार्य करावे. डॉ.कांतिलाल टाटीया यांनीही मार्गदर्शन केले. 
दरम्यान, गेल्या दहा वर्षानंतर पुन्हा आपल्याला आपल्या हक्काच गाव व घर मिळणार असल्याने उपस्थित सर्व बाधितांच्या चेह:यावर समाधानाचे भाव उमटले होते. मात्र नर्मदाविकास  विभाग आणि महसूल प्रशासन या दोन्ही यंत्रणांनी समन्वय ठेवून वसाहतीसाठीच्या पायाभूत सुविधांबरोबरच शाळा, दवाखाने, अंगणवाडी यांची कामे देखील तातडीने पुर्ण करण्याची मागणी विस्थापीतांनी यावेळी केली.
 

Web Title: Families affected by Sardar Sarovar: 52 new colonies for families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.