प्रवाशांना भाडेवाढीचा झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:45 PM2017-10-14T13:45:29+5:302017-10-14T13:45:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाकडून शुक्रवारी मध्यरात्रीपासून एसटी बसच्या दरात दहा टक्के भाडेवाढ करण्यात आली आह़े 14 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान ही भाडेवाढ असणार आह़े नंदुरबारातील विविध आगाराकडूनही भाडय़ात वाढ करण्यात आली आह़े
नंदुरबार आगारातून भाडेवाढ
नंदुरबार-पुणे नगरमार्गे 514 रुपये (मागील भाडे 466 रुपये), नंदुरबार-पुणे रातराणी 660 (मागील भाडे 551 रुपये), नंदुरबार-कल्याण 460 रुपये (मागील भाडे 422 रुपये), नंदुरबार कल्याण रातराणी एक्सप्रेस 549 (मागील भाडे 499 रुपये), नंदुरबार-पंढरपुर 605 रुपये, (मागील भाडे 548 रुपये), नंदुरबार-पंढरपुर रातराणी एक्सप्रेस 713 (मागील भाडे 648 रुपये), नंदुरबार-पुणे नाशिकमार्गे 500 रुपये (मागील भाडे 454 रुपये), नंदुरबार-पुणे नाशिकमार्गे रातराणी एक्सप्रेस 590 रुपये (मागील भाडे 536 रुपये), नंदुरबार-धुळे 111 (मागील भाडे 101 रुपये), नंदुरबार-धुळे रातराणी एक्सप्रेस 131 (मागील भाडे 119 रुपये), नंदुरबार-शहादा 49 रुपये (मागील भाडे 44 रुपये), नंदुरबार-तळेादा प्रकाशामार्गे 49 रुपये (मागील भाडे 44 रुपये), नंदुरबार-तळोदा हातोडामार्गे 31 रुपये (मागील भाडे 23 रुपये), नंदुरबार-साक्री 70 रुपये (मागील भाडे 63 रुपये)
नवापूर आगारातून भाडेवाढ
नवापूर-पुणे 480 रुपये (मागील भाडे 434 रुपये), नवापूर-औरंगाबाद 320 रुपये (मागील भाडे 290 रुपये), नवापूर-धुळे 139 रुपये (मागील भाडे 126 रुपये), नवापूर-बोरोली 445 रुपये (मागील भाडे 403 रुपये), नवापूर-नाशिक 236 रुपये (मागील भाडे 214 रुपये), नवापूर-पुणे रातराणी एक्सप्रेस 566 रुपये (मागील भाडे 514 रुपये), नवापूर-नाशिक रातराणी एक्सप्रेस 279 रुपये (मागील भाडे 253 रुपये)
शहादा आगारातून भाडेवाढ
शहादा-नाशिक 298 रुपये (मागील भाडे 271 रुपये), शहादा-मुंबई 605 रुपये (मागील भाडे 550 रुपये), शहादा-पुणे 513 रुपये (मागील भाडे 460 रुपये), शहादा-पुणे रातराणी एक्सप्रेस 605 (मागील भाडे 560 रुपये, शहादा-नाशिक रातराणी एक्सप्रेस 350 रुपये (मागील भाडे 319 रुपये)़
4दर सहा किलो मीटरसाठी ही भाडेवाढ करण्यात आली आह़े साध्या बसेससाठी पुर्वी 6 रुपये 30 पैसे असलेली भाडेवाढ आता 6 रुपये 95 पैसे करण्यात आली आह़े त्याच प्रमाणे एक्सप्रेस बसेसमध्ये ही हाच दर कायम आह़े रातराणी एक्सप्रेसमध्ये 7 रुपये 45 पैसे दरात वाढ होऊन ती 8 रुपये 20 पैसे झाली आह़े सेमी लक्सरी बसेसची 8 रुपये 60 पैसे दरात वाढ होऊन ती 9 रुपये 90 पैसे झाली होती़ शिवनेरी एक्सप्रेसच्या दरात 15 रुपये 80 पैसे दरात वाढ होऊ ती 18 रुपये 98 पैसे वाढ झाली आह़े