भरधाव वाहन चालविणा:यास न्यायालयाने ठोठावला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 04:20 PM2019-02-03T16:20:25+5:302019-02-03T16:20:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बेदरकारपणे वाहन चालविणा:या प्रवासी रिक्षा चालकास शहादा न्यायालयाने हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सारंगखेडा-कळंबू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बेदरकारपणे वाहन चालविणा:या प्रवासी रिक्षा चालकास शहादा न्यायालयाने हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सारंगखेडा-कळंबू रस्त्यावर जितेंद्र विरचंद पाटील, रा.बोराळे, ता.शहादा हा आपल्या ताब्यातील प्रवासी रिक्षा (क्रमांक एमएच 39 डी 1996) भरधाव वेगात आणत होता. त्यावेळे तेथे पेट्रोलिंगसाठी गेलेले सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहायक निरिक्षिक गणेश न्हायदे व कर्मचारी प्रल्हाद राठोड, विलास पाटील, खंडू धनगर, दत्तात्रय बागल, ठाणसिंग राजपूत यांनी त्याला अडवून त्याच्याविरुद्ध सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शहादा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्या. ए.आर.शेंडगे यांनी चालक जितेंद्र पाटील यास दोषी ठरवत एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दहा दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली.
पैरवी अधिकारी म्हणून महेंद्र सोनवणे होते. अशा निर्णयांमुळे बेदरकारपणे वाहन चालवून प्रवाशांच्या जिविताशी खेळ खेळणा:या वाहन चालकांवर जरब बसणार असल्याचे सहायक निरिक्षक न्हायदे यांनी सांगितले.