विविध मागण्यांसाठी नंदुरबारात शेतकरी जागर मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:44 PM2018-04-04T12:44:06+5:302018-04-04T12:44:06+5:30
शेतक:यांनी पुकारला एल्गार : नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा येथे आयोजन
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार : नंदुरबार, तळोदा व अक्कलकुवा येथे सत्यशोधन शेतकरी संघटना, शेतकरी सुकाणू समिती, लोकसंघर्ष मोर्चा आयोजीत शेतकरी जागर मेळावा झाला़ वन जमीनधारकांना सरसकट कजर्माफी व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी आदी विषयांवर एल्गार पुकारण्यात आला़
या वेळी सुकाणू समितीचे नेते रघुनाथदादा पाटील तसेच शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपटे, अंकुश देशमुख, जगन्नाथ काळे, गणेशकाका जगताप, शिवाजी नांदखीले, सचिन धांडे, किशोर ठमाले, सुभाष काकुस्ते,सुभाष काकुस्ते, करणसिंग कोकणी, लिलाबाई वळवी, भिमसिंग वळवी, मुकूंद सपकाळे, सतीश देशमुख, प्रतिभा शिंदे यांनी वन जमीनधाकांच्या वनहक्कांचे प्रश्न, शेतक:यांची कजर्माफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, बोंडअळीग्रस्त शेतक:यांची नुकसान भरपाई आदी विषयांवर चर्चा केली़ दरम्यान, सर्व संघटनांकडून संबंधित तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होत़े शेतकरी सुकाणू समितीने मे महिन्यात राज्यव्यापी जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आह़े शासनाने विविध मागण्यांची दखल घेण्याची मागणी करण्यात आली़