बोंडअळीची भरपाई अन् 2 हजाराच्या सन्मानासाठी शेतकरी फिरतोय पायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:26 PM2019-10-04T12:26:26+5:302019-10-04T12:26:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतक:यांना वार्षिक सहा हजार रुपये पेन्शन सन्मान देण्याचा कार्यक्रम फेब्रुवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतक:यांना वार्षिक सहा हजार रुपये पेन्शन सन्मान देण्याचा कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यापासून मोठय़ा वाजागाजा करत केंद्र आणि राज्य शासनाने सुरु केला होता़ प्रत्यक्षात आठ महिने उलटूनही 30 हजार शेतकरी पहिल्या हप्त्यापासून वंचित असल्याचे समोर आले आह़े
एकीकडे प्रधानमंत्री सन्मान निधीची बिकट स्थिती असताना दुसरीकडे 2017 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या बोंडअळीचे पैसे दोन वर्ष उलटूनही मिळत नसल्याने शेतक:यांची फिरफिर सुरु आह़े महसूल आणि कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यांनुसार जिल्ह्यात 95 हजार शेतकरी बोंडअळीने बाधित झाले होत़े पंचनाम्यांचा अहवाल दिल्यानंतर यातील केवळ 45 हजार शेतक:यांनाच भरपाईची रक्कम प्राप्त झाली होती़ उर्वरित शेतक:यांना दोन वर्ष उलटूनही बोंडअळीचे पैसेच मिळाले नसल्याने त्यांची फिरफिर सुरु आह़े बँकेत खाते उघडल्यानंतर त्यांची संपूर्ण माहिती तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना दिल्यानंतरही अनेक शेतक:यांची नावे चुकल्याने त्यांच्या खात्यावर केंद्र शासनाकडून टाकण्यात येणा:या पीएफएमएस सिस्टीमद्वारे पैसेच आलेले नसल्याने समस्या वाढीस लागल्या आहेत़ दोन वर्षे उलटूनही न मिळालेले पैसे मिळतील या आशेने शेतकरी बँका, तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय आणि राहिलेच तर जिल्हाधिकारी कार्यालयात भेटी देत विचारणा करत आहेत़
बोंडअळीचे पैसे मिळाले नसताना घोषणा केलेल्या किसान सन्मानच्या वार्षिक रक्कम वितरणातही गोंधळ उडाल्याचा दावा शेतक:यांनी केला आह़े ग्रामस्तरीय समित्यांनी सव्रेक्षण अहवाल दिल्यानंतरही 30 हजार शेतक:यांच्या खात्यावर पहिला हप्ताच आलेला नाही़ दुसरा आणि तिसरा हप्ता मिळालेल्या शेतक:यांचीही संख्या नगण्य आह़े
वार्षिक सहा हजार रुपये देण्याच्या घोषणेनंतर जिल्ह्यात जानेवारी अखेर 1 लाख 15 हजार 535 शेतक:यांची नावे शासनाकडे वर्ग करण्यात आली होती़ या शेतक:यांना मार्च अखेरीस 2 हजाराचा पहिला हप्ता मिळण्याची शक्यता होती़ परंतू जून-जुलैर्पयत 84 हजार 689 शेतक:यांच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा झाल़े यातील 736 शेतक:यांची माहिती योग्य नसल्याने त्यांचे पैसे येऊ शकले नाहीत़ यातील उर्वरित 30 हजार 846 शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आहेत़ दुस:या टप्प्यासाठी 43 हजार 130 शेतक:यांच्या नावांना मंजुरी देण्यात आली होती़ यातील केवळ 27 हजार 100 शेतक:यांच्या खात्यावरच प्रत्येकी 2 हजाराची रक्कम आली़ 16 हजार 30 शेतक:यांची आजही फिरफिर सुरु आह़े तिस:या टप्प्यासाठी केवळ आठ हजार 354 शेतक:यांची नावे ग्राह्य धरत शासनाने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली आह़े उर्वरित शेतक:यांची फिरफिर सुरु आह़े रक्कम मिळणार कधी, यासाठी त्यांच्याकडून संबधित यंत्रणेकडे विचारणा सुरु आह़े परंतू यंत्रणेकडे माहिती नसल्याने गोंधळ निर्माण होतो आह़े
जिल्ह्यात 2016-18 च्या खरीप हंगामात बोंडअळीमुळे 1 लाख 18 हजार हेक्टर्पयतच्या कापूस पिकाचे कमीअधिक प्रमाणात नुकसान झाले होत़े या कापसाच्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे केले होत़े पंचनाम्यानुसार 31 जानेवारी 2017 र्पयत जिल्ह्यात 95 हजार शेतकरी बोंडअळीग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले होत़े यात 2017 अखेर्पयत 43 हजार 688 शेतक:यांच्या खात्यावर शासनाने दिलेली नुकसानभरपाई आली आह़े उर्वरित सुमारे 52 हजार शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आह़े जिल्ह्यात बोंडअळीसाठी साधारण 242 कोटी रुपयांचे पॅकेज जाहिर करण्यात आले होत़े यातील किती रक्कम शेतक:यांच्या खात्यावर गेली अन् किती शासनाकडे परत याचा हिशोब प्रशासनाकडे नसल्याचे स्पष्ट झाले आह़े बँक खात्यांची माहिती योग्य नसल्याचे सांगून टाळटाळ झाल्याने शेतक:यांनी बँकांची सुधारित माहिती दिली होती़ त्यानंतरही रक्कम हाती आलेली नसल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े सर्वाधिक 31 हजार 261 शेतक:यांचा समावेश असलेल्या शहादा तालुक्यात निम्मे शेतकरी बोंडअळीच्या भरपाईपासून वंचित आहेत़