नंदुरबार जिल्ह्यात कापूस दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 05:19 PM2017-11-20T17:19:34+5:302017-11-20T19:51:39+5:30
आॅनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.२० : कापूस दरांमध्ये एक हजार रूपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाची लहर पसरली असून सोमवारी दिवसभरात कापूस खरेदी केंद्रांवर एक हजार क्विंटल कापसाची आवक झाल्याची माहिती आह़े सकाळपासून केंद्रांवर शेतकऱ्यांच्या वाहनांची रांगा लागल्या होत्या़
नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे खरेदी केंद्र आह़े या केंद्रावर गेल्या 26 ऑक्टोबरपासून कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला होता़ याठिकाणी क्विंटलमागे चार हजार 600 दरांची घोषणा करण्यात आली होती़ मात्र कापसाच्या प्रतावारीनुसार शेतकऱ्यांना दर दिले जात होत़े याचदरम्यान सिसीआयच्या अधिकाऱ्यांनी खरेदी सुरू केली होती़ मात्र त्यांनी दोन दिवसांनी कापूस दरात आलेली घसरण आणि सरकीची विक्री थांबल्याने माघार घेत खरेदी बंद केली होती़ याचा परिणाम कापूस खरेदी केंद्राच्या उलाढालीवर होऊन गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात दरांची कापूस कोंडी निर्माण झाली होती़ रविवारी मात्र बाजार बंद असतानाही परवानाधारक व्यापाऱ्यांनी कापसाला वाढीव दर घोषित केल्यानंतर शेतकरी समाधान झाले होत़े हे समाधान सोमवारी उत्साहात परावर्तित होऊन कापसाची आवक वाढल्याचे बाजार समितीने नियुक्त केलेल्या चार परवानाधारक व्यापा:यांकडे दिसून येत होती़ ही आवक सायंकाळर्पयत वाढत असल्याने गेल्या दीड महिन्यात प्रथमच खरेदी केंद्राने गर्दी आणि कापसाच्या राशी अशा दोन्हींचा अनुभव घेतल्याचे चित्र दिसून आल़े कापूस कोंडी फुटल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी सुस्थितीत येण्याची चिन्हे व्यक्त होत आहेत़