दुष्काळी स्थितीत शेतक:यांना मिरचीने तारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:22 PM2018-11-25T13:22:13+5:302018-11-25T13:22:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मिरचीचा हंगाम यंदा जोरात सुरू आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट आवक सुरू आहे. भाव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मिरचीचा हंगाम यंदा जोरात सुरू आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट आवक सुरू आहे. भाव देखील ब:यापैकी मिळत असल्यामुळे शेतक:यांमध्ये समाधान आहे. यंदा दीड लाख क्विंटलपेक्षा अधीक आवक राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारअखेर जवळपास 71 हजार क्विंटल मिरचीची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली.
यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे मिरचीचा बाजार फिका पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु बागायतदार शेतक:यांनी पिकविलेल्या मिरचीचा हंगाम यंदा चांगला आल्याने मिरची उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत अधीक झाले आहे. त्याचा फायदा अर्थात शेतक:यांना मिळत आहे. भाव देखील क्विंटलला तीन हजारापेक्षा अधीकच राहत असल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे. आणखी महिना ते दीड महिना मिरची हंगाम राहणार असल्यामुळे आवक कमी झाल्यावर भाव आणखी वाढण्याची अपेक्षा देखील शेतक:यांमधून व्यक्त होत आहे.
भाव देखील समाधानकारक
यंदा मिरचीचे भाव देखील समाधानकारक असल्याचे चित्र आहे. चांगल्या प्रतीच्या मिरचीला किमान तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटलर्पयत भाव मिळत आहे. साधारण प्रतीच्या मिरचीला किमान दोन हजार रुपये भाव आहे. सध्या आवक ब:यापैकी असल्यामुळे भाव स्थिर आहेत. येत्या काळात जसा मिरची हंगाम संपण्याच्या मार्गावर येईल तसा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ढगाळ वातावरणाचा फटका
गेल्या आठवडय़ात वातावरण बदलल्याने अर्थात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी तुरळक पाऊस देखील झाल्याने मिरचीची आवक निम्म्यावर आली होती. व्यापारी देखील खरेदीसाठी फारसे उत्सूक नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे शेतक:यांनी मिरची तोडचे प्रमाण मर्यादीतच ठेवले होते. शुक्रवारी गुड फ्रायडेनिमित्त सुटी राहील या शंकेने देखील शेतक:यांनी बाजारात फारशी मिरची विक्रीसाठी आणली नसल्याचे चित्र होते.
यंदा मिरची गेल्या वर्षाच्या तुलनेत अधीक आवक होत आहे. गेल्यावर्षी संपुर्ण सिझनमध्ये साधारणत: 35 हजार क्विंटलर्पयत आवक झाली होती. यंदा त्यापेक्षा दुप्पट अर्थात 71 हजारार्पयत आतार्पयत आवक झाली आहे. आणखी महिना, दीड महिना हंगाम लक्षात घेता 60 ते 70 हजार क्विंटल आवक होण्याची शक्यता गृहीत धरता पुर्ण हंगामात दीड लाख क्विंटलर्पयत आवक जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ऐन दुष्काळात शेतक:यांना मिरचीने तारल्याचे चित्र आहे. बाजार समितीत दररोज किमान एक ते दीड हजार क्विंटल आवक सुरू आहे. गेल्या तीन ते चार दिवसात ढगाळ वातावरण लक्षात घेता आवकवर परिणाम झाल्याचे चित्र होते.
पथारी स्थलांतरीत
यंदा अनेक व्यापा:यांनी आपल्या मिरची पथारी शहराबाहेर नेल्या आहेत. पूर्वीच्या मिरची पथारीच्या जागेवर आणि आजूबाजुला मोठय़ा प्रमाणावर रहिवास आणि व्यावसायिक वसाहत झाल्याने त्या भागातील नागरिकांनी पथारींना विरोध केला होता. त्यामुळे व्यापा:यांनी धुळे रस्त्यावरील चौपाळे शिवारात जागा भाडय़ाने घेवून त्या ठिकाणी पथारी सुरू केल्या आहेत. त्यामुळे धुळे रस्त्यावर अनेक भागात लाल गालिचा अंथरलेला दिसून येतो.
याच ठिकाणी मिरचीचे देठ खुडणे, ती सुकविण्यासाठी पसरविणे, कोरडी मिरची पॅकींग करणे, किरकोळ विक्री करणे असे व्यवहार व कामे होत असल्याने या भागात अनेकांना ब:यापैकी रोजगार देखील मिळू लागला आहे. परिणामी या भागात वर्दळ वाढू लागली आहे.