पुष्पदंतेश्वर कारखाना परत मिळविण्यासाठी शेतक:यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:25 PM2017-09-29T12:25:20+5:302017-09-29T12:25:20+5:30
जिल्हाधिका:यांना निवेदन : सर्व प्रक्रियेची नव्याने चौकशी व्हावी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य सहकारी बँकेने विक्री केलेल्या साखर कारखान्यांची गुन्हा अन्वेशन विभागामार्फत सुरू असलेली चौकशी निष्पक्षपातीपणे करावी. कारखाना पुन्हा शेतक:यांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली. यासाठी शेतक:यांनी अर्धनगA आंदोलन देखील केले.
संघटनेचे राज्य पदाधिकारी रविकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष घन:शाम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा गुरुवारी दुपारी काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर तेथे जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, कारखाना शेतकरी, शेतमजूर व सभासदांच्या आर्थिक भांडवलावर उभा राहिला आहे. मात्र कारखाना पूर्ण क्षमतेचे सुरू असताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने तो विक्रीचा घाट घातला. यादरम्यान राज्यातील अनेक कारखान्यांवर राज्य सहकारी बँकेचे कर्ज असताना पुष्पदंतेश्वर साखर कारखान्याची विक्री करण्यात आली. सत्तेचा दुरुपयोग करून कारखान्याची 150 कोटींची मालमत्ता असताना फक्त 47 कोटींमध्ये कारखान्याची विक्री करण्यात आली. कारखाना विक्री झाल्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेण्यात आले. कारखाना विक्री झाला तेव्हा ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी, मजूर व वाहतूक खर्च देणे बाकी होते. ही रक्कम अद्यापही मिळालेली नाही. कारखान्यासाठी शेतक:यांची जमीन व ऊस असताना त्यांच्या मुलांना कारखान्यात रोजगार दिला जात नाही. बाहेरील लोकांना येथे रोजगार दिला जातो. या सर्व कारणांमुळे हे आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद चौधरी, वसंत पाटील, गोरख पाटील, नथ्थू पाटील, मुकेश पाटील, सुरेश पाटील, श्रीपत पाटील यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.