कापसाच्या हमीभावासाठी शेतक:यांचा ‘रास्तारोको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:34 PM2018-11-21T12:34:10+5:302018-11-21T12:34:15+5:30
नंदुरबार : हमीभावापेक्षा कमी दराने होत असलेल्या कापूस खरेदीचा विरोध करत शेतक:यांनी पळाशी येथील नंदुरबार बाजार समितीच्या राजीव गांधी ...
नंदुरबार : हमीभावापेक्षा कमी दराने होत असलेल्या कापूस खरेदीचा विरोध करत शेतक:यांनी पळाशी येथील नंदुरबार बाजार समितीच्या राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर संताप व्यक्त करत आंदोलन केल़े मालाचा दर्जा चांगला असूनही व्यापारी कापसाला कमी भाव देत असल्याने शेतकरी व व्यापा:यांमध्ये वादावादी झाली़
मंगळवारी सकाळी नियमित कापूस खरेदी सुरु झाल्यानंतर व्यापा:यांनी 5 हजार 500 या हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदीला सुरुवात केली़ यावेळी शेतक:यांनी खरेदी केंद्राच्या बोर्डावर 5 हजार 645 ते 5 हजार 699 असे प्रतिक्विंटल दर असताना 5 हजार 100 रुपयांच्या दराला विरोध केला़ यानंतर व्यापा:यांनी खरेदी बंद केल्याचे सांगितल्याने वाद चिघळला़ यावेळी संतप्त शेतक:यांनी नंदुरबार ते वाका रस्त्यावरील पळाशी फाटय़ावर रास्तारोको करत जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांना संपर्क करत तक्रार केली होती़
जिल्हाधिका:यांच्या सूचनेनंतर मध्यस्थी करण्यासाठी तहसीलदार नितीन पाटील व उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शेतक:यांची समजूत काढली होती़ दोघा अधिका:यांच्या मध्यस्थीने रास्तारोको मागे घेणा:या शेतक:यांनी खरेदी केंद्रातच ठिय्या मांडून बाजार समितीच्या सभापतींनी केंद्रावर येऊन तोडगा काढण्याची मागणी केली़ यानुसार सभापती देवमन पवार व संचालक डॉ़ सयाजीराव मोरे यांनी शेतकरी आणि व्यापारी या दोघांची बैठक घेत शेतक:यांच्या मालाच्या प्रतवारीनुसार व्यापारी भाव देतील असे सांगितले होत़े यानंतरही शेतक:यांचे समाधान न झाल्याने अखेर व्यापा:यांनी 5 हजार 350 ते 5 हजार 616 रुपये प्रतिक्विंटल दर देण्याचे घोषित केल्यानंतर पुन्हा खरेदीला सुरुवात करण्यात आली़ बाजार समिती सकाळपासून 60 वाहनांची आवक झाली होती़ या आवकममुळे केंद्रावर मोठी गर्दी होती़ व्यापा:यांनी खरेदी सुरु करतानाच 5 हजार 100 रुपयांनी सुरुवात केली़ यात दोन वाहनांमधील कापूस खरेदी झाला़ परंतू या दरांना आक्षेप घेत शेतक:यांनी खरेदी बंद पाडली़ सीसीआय 5 हजार 450 आणि सूतगिरणी 5 हजार 800 र्पयत दर देत असताना दरांमध्ये घट आणण्याचे कारण विचारल्यानंतर आंदोलनाला तोंड फुटल़े सकाळी 11 वाजेपासून सुरु झालेल्या या प्रकारामुळे तळोदा ते नंदुरबार दरम्यानची वाहतूक अर्धा तास बंद झाली होती़
दुपारी खरेदीनंतर खरेदी केंद्रातून देण्यात आलेल्या माहितीनुसार कापसाचे दर हे 5 हजार 350 ते 5 हजार 616 एवढे राहणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े एकीकडे कमी दरात खरेदी होत असताना 5 हजार 450 रुपये दर देणा:या सीसीआयने अद्यापही कापूस खरेदी केलेली नाही़ सीसीआयचा जिनिंग मालकांसोबत असलेला भाडेपट्टय़ाचा वाद अद्यापही शमलेला नसल्याने कापूस खरेदीच झालेली नाही़ आंदोलन सुरु असताना सीसीआयचे अधिकारी किंवा कर्मचारी याठिकाणी उपस्थित नसल्याने शेतक:यांनी नाराजी व्यक्त केली़