शेतकऱ्याच्या कष्टाला आले फळ टॉमेटो विक्रीतून मिळाले पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:45 PM2020-07-27T12:45:19+5:302020-07-27T12:45:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे़ वाहतूक व्यवस्थेअभावी बाजारपेठेपासून वंचित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे़ वाहतूक व्यवस्थेअभावी बाजारपेठेपासून वंचित असल्याने उत्पादनांची नासाडी होत आहे़ या समस्येवर मात्र मोहिदा ता़ तळोदा येथील एका शेतकºयाने मात करत दोन पिकवलेला टोमॅटो थेट गुजरात राज्याच्या बाजारात पोहोचता करुन त्यातून नफाही कमावला आहे़
आनंद रमण चौधरी (मराठे) असे शेतकºयाचे नाव असून गेल्या चार महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे इतर शेतकºयांप्रमाणेच त्यांचेही भाजीपाला उत्पादन मातीमोल भावात विक्री होण्याची वेळ आली होती़ परंतु एकरी ५० हजारापर्यंत केलेल्या खर्चाची थोडीतरी वसुली व्हावी याचा चंग बांधत त्यांनी गुजरातची बाजारपेठ गाठली़ आनंद चौधरी यांनी सहा महिन्यांपूर्वी दोन एकरात टोमॅटो तर एक एकरात कार्ले वेल लागवडीचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार शेतमशागत आणि कामे पूर्ण करत त्यांनी रोपांची लागवडही केली़ यातून कार्ल्याचे वेल हे चांगल्या प्रकारे बहरले तर टोमॅटोनेही बाळसे धरले होते़ दरम्यान लॉकडाऊन सुरू झाल्याने शहरी भागाकडे जाणारा माल पूर्णपणे थांबला होता़ यातून ग्रामीण भागात किरकोळ विक्री करणारे विक्रेते येऊन टोमॅटो आणि कार्ले घेऊन जात होते़ परंतु यातून खर्चही निघत नसल्याने शेतकरी चौधरी यांनी स्वत:च सूत्रे हातात घेत सुरत येथील बाजारपेठ गाठण्याचा निर्णय घेतला़ कृषी विभागाने भाजीपाला वाहतूकदारांना दिलेल्या परवान्यासह महसूल विभागाच्या प्रवासी पासची मागणी करत त्यांनी स्वत: वाहन चालवत सुरत येथे प्रवास केला होता़ याठिकाणाच्या बाजारात ठोक भावात टोमॅटो २५ रूपयांपर्यंत विक्री होत होता़ शेतकºयाने चांगल्या दर्जाचा टोमॅटो बाजारात नेल्याने तेथील व्यापारी आणि आडतदारांनी तो हातोहात खरेदी केला़ प्रतीएकर १ लाख १० रूपयांचा टोमॅटो त्यांनी आतापर्यंत सुरतपर्यंत पोहोचता केला आहे़ यातून त्यांना २ लाख २० हजार रूपयांचा लाभ झाला आहे़ दरम्यान अत्यंत गंभीर परिस्थितीला सामोरे जात त्यांनी उत्पादनाची योग्य पद्धतीने विक्री केल्याने इतर शेतकºयांमध्ये ते चर्चेचा विषय ठरले आहेत़ दरम्यान त्यांनी मोहिदे शिवारातील शेतातूनच कार्ल्याची विक्रीही सुरू केली आहे़ या कार्ल्यांना मागणी असून परिसरातील ग्रामस्थ शहरी भागात राहणाºया नातलगांना ते पोहोचते करुन देत आहेत़
तळोदा तालुक्याच्या विविध भागातून गुजरात राज्यात जाणाºया भाजीपाल्याच्या गाड्या गेल्या काही दिवसांपासून योग्य मार्गदर्शनाअभावी बंद आहेत़ मोहिदे येथील शेतकºयाने दाखवलेल्या धारिष्ट्याने ही वाहने पूर्ववत सुरू होवून शेतकºयांना दिलासादायक ठरतील़