घोटाणे येथील केटी वेअरला गळती लागल्याने शेतक:यांची वाढली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 11:53 AM2019-08-26T11:53:00+5:302019-08-26T11:53:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क न्याहली : नंदुरबार तालुक्यातील रनाळे ते घोटाणे दरम्यानच्या केटी वेअर बंधा:याला गळती लागल्याने शेतक:यांमध्ये चिंता व्यक्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
न्याहली : नंदुरबार तालुक्यातील रनाळे ते घोटाणे दरम्यानच्या केटी वेअर बंधा:याला गळती लागल्याने शेतक:यांमध्ये चिंता व्यक्त होत आह़े कार्ली फाटय़ाजवळ रनाळे शिवारात असलेल्या या बंधा:यामुळे दोन्ही गावातील शेतक:यांना लाभ होतो़
यंदा पूर्व भागात 10 वर्षाच्या कालावधीनंतर समाधानकारक पाऊस होऊन नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत़ यामुळे ठिकठिकाणी क़ेटी़वेअरसह सिमेंट बंधारे ओसंडून वाहत आहेत़ रनाळे गावाजवळून वाहणा:या नाल्यावरही घोटाणे ते रनाळे दरम्यान असलेल्या क़ेटी़वेअर बंधा:यातही पाणीसाठा झाला होता़ परंतू येथील काही दरवाजे हे तुटलेले असल्याने त्याखालून पाणी जात असल्याचे दृश्य रस्त्यावरुन ये-जा करणा:यांना दिसून येत आह़े प्रशासनाकडून या बंधा:यात सर्व दरवाजे टाकणे गरजेचे असताना केवळ मोजकेच दरवाजे टाकल्याचे चित्र आह़े उर्वरित दरवाजांबाबत अधिकारी व कर्मचारी उत्तरे देत नसल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े प्रकल्पातून पाणी असेच वाहत राहिल्यास सहा महिने टिकाव धरु पाहणारे पाणी येत्या 15 दिवसातच वाहून जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आह़े याकडे संबधित विभागाने गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी आह़े या भागात या पाण्यामुळे भाजीपाला आणि खरीपसह रब्बी पिकांनाही लाभ होणार आह़े परंतू पाणी वाहून जात असल्याने चिंता व्यक्त होत आह़े
पाणी साठा दीर्घ काळ टिकून राहिल्यास या भागातील शेतक:यांच्या कूपनलिका आणि विहिरी यांची पातळी स्थिर राहून शेतीला आधार होणार आह़े रब्बीर्पयत हे पाणी पुरणार असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देवून वाहून जाणारे पाणी अडवण्याची मागणी रनाळे आणि घोटाणे परिसरातील शेतक:यांची आह़े