मजुर टंचाईने शेतकरी मेटाकुटीस : तळोदा परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:37 PM2017-12-11T12:37:43+5:302017-12-11T12:37:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील विविध परिसरात सध्या मजुर टंचाईने येथील शेतकरी तसेच ऊस उत्पादक मेटाकूटीस आला आह़े कामांसाठी मजुरच मिळत नसल्याने नाईलाजास्तव शेतक:यांना आपल्या कुटुंबियांसमवेतच शेतीची कामे आटोपती घ्यावी लागत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आह़े
तळोदा तालुक्यातील रांझणीसह प्रतापपूर परिसरात उसतोडीस प्रारंभ झाला आह़े रांझणी, प्रतापपूर गावात तसेच शेतीशिवारात ऊसतोड कामगारांची तीव्र टंचाइ जाणवत आह़े येथील बहुतेक उसतोड मजुर लगतच्या गुजरात राज्यात तात्पुरते स्थलांतरीत झाले असल्याची स्थिती आह़े तुलणात्मकदृष्टय़ा स्थानिक मजुरीपेक्षा परराज्यात मजुरी चांगली असल्याने मुजरांकडून तेथे जाण्यास पसंती देण्यात येत असल्याचे सांगण्यात आल़े
दरम्यान, परिसरात गळीत हंगाम सुरु झाला असला तरी शेतक:यांकडून मजुरांची टंचाई असल्याचे सांगण्यात येत आह़े याचे मुख्य कारण म्हणून त्यांचे गुजरात सौराष्ट्रात झालेले स्थलांतर आह़े त्याचप्रमाणे यंदा महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यात ब:यापैकी पाऊस झाला असल्याने हे मजुर राज्यातही इतर ठिकाणी गेले असल्याचे सांगण्यात येत आह़े
कारखानदार राहताय विसंबून
नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक ऊसतोड कामगार गुजरात तसेच राज्यातील इतरही ठिकाणी ऊसतोडीसाठी जात असतात़ त्यामुळे स्थानिक कारखानदारांना इतर ठिकाणाहून ऊसतोड कामगारांची आयात करावी लागून त्यांच्यावरच विसंबून रहावे लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े असे असल्याने पावसाळ्यात जिल्ह्यातील उसतोड कामगारांच्या आर्थिक अडचणी सोडविल्यास तसेच मजुरीचे दर वाढवून दिल्यास मजुरांचे स्थलांतर होणार नसल्याचेही या क्षेत्राती जाणकारांकडून सांगण्यात येत आह़े त्यांना स्थानिक ठिकाणीच चांगली मजुरी मिळाल्याने ते इरतत्र जाण्यास धजावणार नसल्याचेही बोलले जात आह़े तळोदा तालुक्यातील बोरद, मोड, रांझणी, प्रतापपूर आदी उसपट्टयांत मोठय़ा क्षेत्रांवर उसाची लागवड करण्यात आली आह़े त्यामुळे दरवर्षी गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतक:यांना मजुरांची चिंता लागून असत़े
उसतोडीस दरवर्षी शेकडोंच्या संख्येने येथील स्थानिक मजुर बाहेर स्थलांतरीत होत असल्याने या ठिकाणी या दिवसांमध्ये कारखानदार, शेतक:यांसमोर मोठय़ा प्रमाणात अडचणी निर्माण होत आह़े दरम्यान, परराज्यात तात्पुरते स्थलांतर होत असल्याने तळोदा तालुक्यातील बहुतेक गावे ओस पडू लागली आह़े या दिवसांत उसतोडीसाठी सर्वाधिक स्थलांतर होत असल्याने गावात सर्वत्र शांततेचे वातावरण दिसून येत असत़े