कांदा बियाण्यासाठी शेतकऱ्यांचे ‘देशाटन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 01:06 PM2020-10-08T13:06:37+5:302020-10-08T13:06:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात यंदा कांदा लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांकडे बियाणे शिल्लक नाही. परिणामी शेतकरी परजिल्ह्यातून बियाणे खरेदी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात यंदा कांदा लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांकडे बियाणे शिल्लक नाही. परिणामी शेतकरी परजिल्ह्यातून बियाणे खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून शेतकरी नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्यात भेटी देत असल्याचे दिसून आले आहे.
‘लोकमत’ने याबाबत पडताळणी केली असता, जिल्ह्यातील अनेक भागात यंदा कांदा लागवडीसाठी बियाणेच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील वितरक आणि कांदा बियाणे विक्रेते यांच्याकडे बियाणे शिल्लक नसल्याचा दावा त्यांच्याकडून होत आहे. परंतु काही ठिकाणी दीड हजार रूपये किलो दराने मिळणारे बियाणे शेतकरी चक्क तीन हजार रूपये किलो दर देवून खरेदी करत असल्याचे समोर आले आहे. यात प्रामुख्याने नंदुरबार आणि शहादा तालुक्यातील शेतकºयांचा समावेश आहे. जिल्ह्यात साधारणपणे रांगडा कांद्याची नोव्हेंबर महिन्यापासून लागवड सुरू करण्यात येते. यंदाही शेतकरी कांदा लागवडीच्या प्रयत्नात होते. परंतु गेल्या काही महिन्यात कांदा बियाणे निर्मिती प्रक्रियेवर परिणाम झाला असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. यातून बियाणे उत्पादक कंपन्यांकडे बियाणे नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. यातून जिल्ह्यात कांदा बियाणे टंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई दूर होण्याची शक्यता नसल्याने शेतकरी नातेवाईक तसेच ओळखीच्यांना संपर्क करुन बियाणे मागणी करत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही वर्षात कांदा दरांमध्ये होणाºया घसरण आणि वाढीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कांदा लागवडीत वाढ करण्याच्या प्रयत्नात आहेत. यंदा पाउसही चांगला झाला असल्याने शेतकºयांकडून कांदा लागवडीवर भर देण्यात येत आहे.
४नंदुरबार तालुक्यात यंदा सर्वाधिक कांदा लागवड होण्याची शक्यता होती. शेतकºयांनी मराठवाड्यातील कन्नड आणि औरंगाबाद परिसरातून बियाण्याची आवक केली आहे. हे बियाणे अत्यंत महाग दरांनी मागणवण्यात आले आहे.
४जिल्ह्यात गेल्या हंगामात कांदा उत्पादन हे एकरी साठ ते सत्तर किलो पर्यंत आले होते. परिणामी बियाणे तयार होण्याची प्रक्रिया झालेली नाही. म्हणून शेतकरी धुळे आणि नाशिक जिल्ह्यातही सातत्याने चाचपणी करुन बियाण्याची मागणी करत आहेत.
४जिल्ह्यात पावसाळी कांदाही खराब झाला असल्याने शेतकºयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
यंदा कांदा बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकºयांचे हाल होत आहेत. शेतकरी सर्वत्र संपर्क करुन कानोसा घेत आहेत. परंतु यश पदरात पडत नाही. बियाणे टाकण्याची वेळ टळत असल्याने अनेक जण वाढीव आणि चढ्या दराने कांद्याची खरेदी करत आहेत. ही स्थिती नंदुरबार तालुक्यात सर्वत्र आहे.
-समाधान पाटील,
शेतकरी, आसाणे ता. नंदुरबार.
कृषी विभाग शेतकºयांच्या बियाणे टंचाईवर लक्ष ठेवून आहे. ३४ क्विंटल बियाणे व्यापाºयांकडे होते. हे सर्व बियाणे विक्री झाले आहे.
-एन.डी.पाडवी, बियाणे गुणनियंत्रण अधिकारी, कृषी विभाग, नंदुरबार.