उपसा योजना प्रकरणी शेतक:यांचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:22 PM2019-05-29T12:22:22+5:302019-05-29T12:22:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तापी नदीवरील 22 उपसा सिंचन योजना दुरुस्तीची कामे तात्काळ व्हावीत या मागणीसाठी शेतक:यांनी सोमवारपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तापी नदीवरील 22 उपसा सिंचन योजना दुरुस्तीची कामे तात्काळ व्हावीत या मागणीसाठी शेतक:यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले होत़े शेतक:यांनी घेतलेल्या या पवित्र्याला प्रशासनाने प्रतिसाद देत मंगळवारी चर्चा केली़ यात 2 जून रोजी बैठक घेऊन तोडगा काढण्यावर भर दिला गेल्याने शेतक:यांनी तात्पुरते उपोषण स्थगित केले आह़े
मंगळवारी उपोषणाच्या दुस:या दिवशी मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डी़डी़जोशी यांच्यासह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र आमले, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी उपोषणस्थळी जाऊन आंदोलनकत्र्या शेतक:यांची भेट घेतली़ यावेळी 22 उपसा सिंचन योजनांचे चेअरमन, पदाधिकारी, शेतकरी तसेच सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील उपस्थित होत़े आंदोलनकर्ते आणि शेतकरी यांच्या यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान बाजू मांडताना शेतक:यांनी योजना तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी लावून धरली़ यावर उत्तर देताना अधिका:यांनी 2 जून रोजी विस्तृत बैठक घेऊन चर्चा करण्याचे आमंत्रण दिल़े विभागाच्या या आमंत्रणाचा स्विकार करत आंदोलनकर्ते बैठकीत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आल़े
प्रसंगी माहिती देताना जलसंपदा विभाग योजनांच्या दुरुस्तीसाठी प्रयत्नशील असून त्यावर लवकरच कारवाई होणार असल्याचे अधिका:यांनी सांगून बैठकीचे पत्रही उपोषणकत्र्याना दिल़े सातपुडा कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांच्याहस्ते आंदोलकांना पाणी देऊन उपोषण सोडवण्यात आल़े दरम्यान 2 जून रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणा:या या बैठकीत उपसा सिंचन योजनांचे चेअरमन, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित राहणार आहेत़ या बैठकीत योग्य तो तोडगा न निघाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आह़े